चांगली बातमी! कोरोना लस येण्याआधीच भारतीयांमध्ये प्रतिकारशक्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 14 November 2020

थंडीच्या काळात अधिक सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येतील उतरता कल लक्षात घेता देशात लस येण्याआधीच भारतीयांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता लक्षणीय प्रमाणात वाढण्याची चिन्हे आहेत, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नमूद केले आहे.

प्रयोगशाळेत तयार झाल्याचे सांगण्यात येणाऱ्या या विषाणूने आपले स्वरूप त्याआधी बदलू नये, अशी आशा व्यक्त करून ते म्हणाले की, गेले काही दिवस रुग्णांचा जो उतरता कल देशातील अनेक राज्यांमध्ये बघायला मिळतो आहे. तो पाहता अशीही शक्यता आहे की लस येण्यापूर्वीच भारतीयांमध्ये रोग प्रतिरोधक क्षमता विकसित मोठ्या प्रमाणावर विकसित होईल की बहुतांश नागरिकांना लशीची आवश्यकताच भासू नये.

कोरोनामुळे होतायत रक्ताच्या गुठळ्या; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

हा कल उतरता राहील याबद्दल समाधान व्यक्त करतानाच डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, थंडीच्या काळात अधिक सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. हिवाळ्याच्या दिवसांत कोरोनाचा विषाणू हवेत जास्त काळ सक्रीय राहण्याची शक्यता असते. हे लक्षात घेता नागरिकांनी सावधगिरी बाळगली नाही तर या साथीची आणखी एक लाटही येऊ शकतो. त्यामुळेच कोविड-१९ विषाणूच्या साथीला हरवायचे , तर आरोग्य त्रिसूत्रीचे काटेकोर पालन प्रत्येकाने करणे ही स्वतःची जबाबदारी मानली पाहिजे. नागरिकांनी शक्यतो ऊन असेल तरच घराबाहेर पडावे आणि आवश्यक नसेल तर घराबाहेर पडण्याचे टाळले पाहिजे.

केंद्र सरकारने कोरोना लशीचे संशोधन आणि निर्मितीसाठी १२० दशलक्ष डॉलरची तरतूद केली आहे, ज्यामध्ये लशीच्या वितरण खर्चाचा समावेश नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आठव्या ब्रिक्स एसटीआय मंत्रिस्तरीय गटाच्या व्हर्च्युअल बैठकीत सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immunity in Indians even before the corona vaccine