मोठी बातमी! देशात रशियाच्या 'स्पुटनिक' लशीला परवानगी

sputnik
sputnik

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रमुख पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मतं आहे. त्यादृषीने देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. पण, देशातील अनेक राज्यांनी लशींची कमतरता जाणवत असल्याची तक्रार केली आहे. अशात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. भारत सरकारने रशियाच्या 'स्पुटनिक' लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. देशात सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या वापर सुरु आहे. ४५ वर्ष वयापुढील सर्व व्यक्तींना कोरोनावरील लस दिली जात आहे. पण, लशीच्या पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. लशींची चणचण जाणवत असताना देशाला स्पुटनिक लस मिळाल्यास मोठी मदत होणार आहे. रशियाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, स्पुटनिक लस ९० टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे कोरोना विषाणूविरोधात लढणारी पहिली लस रशियाने तयार केली होती. रशियाने अगदी कमी वेळात स्पुटनिक लस बाजारात आणल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर शंका घेण्यात आली होती. पण, रशियाने शोध निबंध प्रकाशित शंका दूर करण्याचा प्रयत्न केला होता. 

भारतात जगातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सध्या सुरु आहे. दरम्यान, लसीच्या नव्या टप्प्यांमध्ये लस घेणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लसींचा तुटवडा भासत असल्याचं चित्र आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इतर लस निर्मितींचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. दरम्यान, उच्चपदस्थ सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत भारतात आणखी पाच कंपन्यांची लस दाखल होणार आहे. त्यातच रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' या लशीला भारतात आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. 

भारतात सध्या 'कोविशिल्ड' आणि 'कोव्हॅक्सिन' या दोन कोविड-१९ लस उपलब्ध आहेत. या दोन्ही लसींचे उत्पादन भारतातच होत आहे. यानंतर येत्या तिमाहित आणखी पाच लस भारतात दाखल होणार आहेत. यामध्ये 'स्पुटनिक व्ही' ही लस (डॉ. रेड्डीज या फार्मा कंपनीच्या सहकार्याने), 'जॉन्सन अॅण्ड जॉन्सन' (बायोलॉजिकल ई या फार्मा कंपनीच्या सहकार्याने), नोवाव्हॅक्स (ही लस सीरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने) तसेच झायडस कॅडिला आणि भारत बायोटेक स्वतः एक लस बाजारात आणणार आहे. यामध्ये या लशींना आपत्कालिन वापरासाठी परवानगी देताना सुरक्षा आणि प्रभावीपणा हा केंद्र सरकारचा प्राथमिक काळजीचा विषय आहे.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (RDIF) भारतीय फार्मा कंपन्यांसोबत सहकार्य करार केला आहे. यामध्ये हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज, हेटरो बायोफार्मा, ग्लँड फार्मा, स्टेलिअस बायोफार्मा आणि विक्रो बायोफार्मा यांच्यामार्फत लसीचे डोस तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे. या सर्वांची मिळून 'स्पुटनिक व्ही' चे देशात ८५० मिलियन (८ अब्ज ५० कोटी) डोस तयार करण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारतात 'स्पुटनिक व्ही' ही कोरोनाच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावेल अस सांगण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com