कोरोना माणूस नाही, माणूसकीही मारतोय; मेलेल्या बापाला सोडून पोरगं पळालं

corona patient
corona patient

पाटणा- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने सर्वांनाच धास्ती वाटत असून या काळात जीवाभावाची नातीही दुरावत असल्याचे दिसत आहे. बिहारमधील दरभंगा येथे अशीच एक हृदयद्रा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त ज्येष्ठ रुग्णाचे निधन झाले. पित्याचे अंतिम संस्कार करण्‍यास मुलगा येणार होता. पण तो आलाच नाही. संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्याचा दूरध्वनीही बंद होता. विशेष म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा रुग्णालयातून निघून गेला होता. त्यामुळे कबीर सेवा संस्थेच्‍या स्वयंसेवकांनीची ज्येष्ठावर अंत्यसंस्कार केले. ज्या ज्येष्ठाचा कोरोनामुळे मृत्यू झाला ते निवृत्त रेल्वे कर्मचारी होते. त्यांची पत्नी व तीनपैकी दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जो मुलगा निगेटिव्ह होता त्याने वडिलांचा मृतदेह घेऊन जायला असमर्थ असल्याचे त्याने रुग्णालयाला लिहून दिले होते. त्यानंतर तो रुग्णालयातून सोडून पळून गेला.

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दीडलाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या वाढू लागल्याने हॉस्पिटलमध्ये बेडची कमतरता भासू लागली आहे. अनेक हॉस्पिटलसमोर रांगा लागल्याचेही पाहायला मिळाले. कोरोना विषाणूमुळे मेलेल्या रुग्णांना पुरण्यासाठी किंवा जाळण्यासाठीही जागा कमी पडू लागल्याची स्थिती आहे. याच काळात जवळची माणसही साथ सोडताना दिसत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com