पुढील वर्षीही कोरोना राहणार - डॉ. रणदीप गुलेरिया

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 6 September 2020

कोरोनाचा संसर्ग भारतात पुढील वर्षीही (२०२१) कायम राहण्याची भीती आहे. केंद्र सरकारच्या कोरोना कृती गटाचे सदस्य व दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीच ती व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग भारतात पुढील वर्षीही (२०२१) कायम राहण्याची भीती आहे. केंद्र सरकारच्या कोरोना कृती गटाचे सदस्य व दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीच ती व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोठ्या प्रमाणावर लोक आरोग्याचे नियम पाळत नसल्याने दिल्लीसह देशाच्या अन्य काही भागांत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसत आहे असेही त्यांनी सांगितले. 

उद्योगस्नेही टॉप टेन राज्यात महाराष्ट्र नाहीच; शेजारी राज्य पहिल्या क्रमांकावर

सारे काही निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत होत गेले तर कोरोनावरील भारतीय लस यावर्षीच्या अखेरपर्यंत निश्‍चित येईल  अशी आशा व्यक्त करून डॉ. गुलेरिया म्हणाले, की भारतात तीन लसींच्या चाचण्या प्रगतिपथावर आहेत. मात्र कोणतीही लस जनतेला उपलब्ध करून देण्याआधी तिची सुरक्षितता सर्व बाजूंनी व्यवस्थित तपासणे गरजेचे असते. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona will stay next year as well dr randeep guleria