esakal | आता कोरोनावर यशस्वी उपचार होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

आता कोरोनावर यशस्वी उपचार होणार?

भारत बायोटेकसह काही कंपन्यांकडून होतीये निर्मिती

- लसींची निर्मिती कमी

आता कोरोनावर यशस्वी उपचार होणार?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यावर लस निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. पण आता भारतीय कंपन्यांनी सर्वांनाच मोठा दिलासा दिला आहे. भारतातील ६ कंपन्यांनी कोरोनावर औषध शोधले असून, त्याचा माणसांवर वापर करून परीक्षण करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यासाठी औषध किंवा लस अद्याप उपलब्ध झाली नाही. पण वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविणे यातील एक पर्याय असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याचदृष्टीने औषध निर्मिती करण्याचे नियोजन आहे.

लसींची निर्मिती कमी

कोरोना व्हायरसवर प्रभावी म्हणून लस या कंपन्यांना बनविता आली तरीदेखील 2021 पूर्वी हे औषध मोठ्या प्रमाणावर तयार होण्याची शक्यता फारच कमी आहे. 

70 प्रकारच्या लसी

भारतातील या कंपन्यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी जवळपास ७० प्रकारच्या लसी शोधल्या आहेत. त्याची चाचणी सुरु असून, यातील तीन औषधे माणसांवरील परीक्षणाच्या टप्प्यामध्ये पोहोचली आहेत. या लसींच्या यशस्वी चाचण्या झाल्यानंतर कोरोनापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे.

भारत बायोटेकसह काही कंपन्यांकडून होतीये निर्मिती

भारत बायोटेक, मिनवॅक्स, जॉयडस कॅडिला, सीरम इन्स्टिट्यूट, बायोलॉजिकल ई आणि इंडियन इम्युनोलॉजिकल या कंपन्या कोरोना व्हायरसवर औषधांची निर्मिती करत आहेत. यातील कॅडिला ही कंपनी दोन औषधांवर काम करत आहे. 

loading image
go to top