esakal | अरे देवा! इथे चाललंय काय! आणि भाजप करतंय काय?
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

बिहारमध्ये ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे तयार असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्व २४३ जागांवर विजय मिळविण्याचे आमचे लक्ष्य आहे.
- भूपेंद्र यादव, बिहारचे प्रभारी

अरे देवा! इथे चाललंय काय! आणि भाजप करतंय काय?

sakal_logo
By
उज्ज्वल कुमार

पाटणा - कोरोनाच्या साथीतच भाजपने बिहार विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. कोरोनामुळे सर्व बैठका, सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. याची सुरुवात रविवारपासून (ता.७) होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यातील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख व जिल्हा पदाधिकाऱ्यांचा एकत्र मेळावा घेणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेळाव्यात अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. एक लाखापेक्षा जास्त पक्ष कार्यकर्ते यात सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहा यांचे भाषण सामान्य नागरिकांनाही ऐकता यावे, यासाठी पदाधिकार््‍यांनाअ टीव्ही संच लावण्याची सूचना दिली असून बूथ पातळीवरिल कार्यकर्तेही यात सहभागी होतील.

२२२ वर्षांनी हज यात्रेवर दुसऱ्यांदा संकट; काय आहे 'हज'चा इतिहास? वाचा सविस्तर

बिहारमध्ये ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे तयार असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्व २४३ जागांवर विजय मिळविण्याचे आमचे लक्ष्य आहे.
- भूपेंद्र यादव, बिहारचे प्रभारी

काय चाललंय काय? चिनविरोधी मोहिम राबवणाऱ्या अमुलचं ट्विटर झालं ब्लॉक

मेळाव्याची तयारी

  • प्रदेश अध्यक्ष डॉ. संजय जायस्वाल आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या ऑनलाइन बैठका
  • बैठकीत विभाग पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
  • बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडून विधानसभा पातळीवरील आढावा