२२२ वर्षांनी हज यात्रेवर दुसऱ्यांदा संकट; काय आहे 'हज'चा इतिहास? वाचा सविस्तर

Hajj_Mecca
Hajj_Mecca

नवी दिल्ली : जगभरातील मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या हज यात्रेवरही कोरोना साथीमुळे अनिश्‍चिततेचे सावट आले आहे. युद्ध, राजकीय वाद, नैसर्गिक आपत्ती आणि रोगराई या कारणांमुळे हज यात्रा यापूर्वी रद्द करण्यात आली होती.

यापूर्वीही चार वेळा रद्द झाली होती हज यात्रा 

हजच्या इतिहासात इ.स.९३० मध्ये पहिल्यांदा हज यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर इ.स.९६७ साली प्लेग या साथीच्या रोगामुळे, आणि १०४८ साली पडलेल्या दुष्काळामुळे हज यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर सन ११६८ मध्ये फॅटिमिड्सच्या पडझडीच्या वेळी अनेक लोक हजमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. असेही म्हटले जाते की १२५८ मध्ये झालेल्या मंगोल आक्रमणानंतर बगदादमधील कोणीही वर्षानुवर्षे हजला गेले नाही.

२२२ वर्षांनी दुसऱ्यांदा संकट

बऱ्याच वर्षानंतर नेपोलियनच्या सैन्याने हल्ला केल्यामुळे १७९८ ते १८०१ मध्येही हज यात्रेत खंड पडला होता. 1932 मध्ये सौदी किंगडमची स्थापना झाल्यापासून ही यात्रा दरवर्षी भरवली जात होती. मात्र, यंदा आलेल्या कोरोना व्हायरस या जागतिक महामारीमुळे तब्बल त्यानंतर २२२ वर्षांनी ती रद्द होण्याची शक्यता आहे. हजपेक्षा वेगळी पण मक्का मदिनेतच होणारी ‘उमरा’ ही यात्राही सौदी सरकारने फेब्रुवारीत रद्द केली होती.

यात्रेकरूंना १०० टक्के परतावा मिळणार

दरम्यान, यंदाची हज यात्रा सौदी अरेबियाने रद्द केली तर ज्यांनी त्यासाठी आरक्षण केले त्यांना १०० टक्के परतावा दिला जाईल, असे मुख्तार अब्बास नक्वी यांच्या अल्पसंख्याक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या भारतीय हज समितीने स्पष्ट केले. 

सौदी अरेबियातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. तिकडे सध्या ९५ हजार पेक्षा जास्त कोरोना बाधित असून ६४२ बळी गेले आहेत. त्यामुळे हज यात्रा रद्द होण्याची शक्यता जास्त आहे. हजला यंदाच्या यात्रेबाबत सौदी अधिकाऱ्यांकडून अद्याप काहीही माहिती मिळालेली नसल्याचे समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ. एम ए. खान यांनी सांगितले. 

ज्यांनी हजसाठी पैसे भरले असतील, पण सध्याच्या परिस्थितीत ते जाऊ इच्छित नसती तर त्यांना भरलेले पैसे परत दिले जातील, असे भारतीय हज समितीने स्पष्ट केले आहे. जे यात्रेकरू यात्रा रद्द केल्याचा अर्ज भरून पासबुकची छायाप्रत व रद्द असलेल्या चेकसह समितीकडे ईमेल करतील त्यांनी भरलेले पैसे परत केले जातील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com