धक्कादायक : ब्राह्मण मजुरांनी नाकारले मागासाच्या हातचे जेवण 

उज्ज्वल कुमार
Tuesday, 26 May 2020

झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील एका विलगीकरण केंद्रात चार ब्राह्मण स्थलांतरित मजुरांनी मागास वर्गातील युवकाने तयार केलेले अन्न खाण्यास नकार दिला. या मजुरांसाठी आता कोरडे पदार्थ देण्याची सोय केली आहे.

पाटणा - झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील एका विलगीकरण केंद्रात चार ब्राह्मण स्थलांतरित मजुरांनी मागास वर्गातील युवकाने तयार केलेले अन्न खाण्यास नकार दिला. या मजुरांसाठी आता कोरडे पदार्थ देण्याची सोय केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हजारीबागमधील विष्णुगड गावातील एका विलगीकरण कक्षात शंभरहून अधिक स्थलांतरित मजूर आहेत. यात काही मागास, मुस्लीम आणि अन्य जाती व समाजाचे लोक आहेत. येथील चार ब्राह्मण मजुरांनी मागास जातीतील युवकाने तयार केलेले जेवण घेण्यास नकार दिल्यानंतर खळबळ उडाली. 

पूर्व लडाखमध्ये चीनची घुसखोरी; सीमेवरील कुरापती वाढल्या 

हजारीबागचे उपायुक्त भुवनेश प्रतापसिंह यांनी ‘जे असे अन्न घेणार नाहीत, त्यांना कोरडे पदार्थ देण्यात येतील,’ असे सांगितले. ब्राह्मण मजुरांना अशा प्रकारे वेगळे जेवण देण्यावर काही सामाजिक संस्थांनी आक्षेप नोंदविला आहे. ‘‘सरकारने सामाजिक भेदभाव नष्ट करणे गरजेचे असताना उलट अधिकारीच त्याला प्रोत्साहन देत आहेत. सरकारी केंद्रात जातीच्या आधारे जेवण पुरविणे चुकीचे आहे,’’ असे मत सामाजिक कार्यकर्ते प्रबल महतो यांनी व्यक्त केले. 

ऐतिहासिक सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप देशभरात ऑनलाईनच सेलिब्रेशन करणार

स्थानिक अधिकाऱ्यांचा पाठिंबा
जातीनिहाय खानपान व्यवस्थेला स्थानिक अधिकाऱ्यांचाही पाठिंबा असल्याचे दिसत आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार १४ दिवसांचीच तर बाब आहे. विलगीकरण केंद्रातील जेवण ज्यांना नको आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल आघाडीचे सरकार असूनही असे भेदभाव होत आहेत, याबद्दल काही जणांनी नाराजी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus brahman workers rejected mail from scheduled caste jharkhand