esakal | सावधान! कोरोना दिल्लीत धडकलाय; भारतात पुन्हा आढळले दोन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus detect patient found in Delhi and Telangana

दिल्लीत एक कोरोनाबाधित रूग्ण सापडला असून तेलंगणा राज्यातही कोरोना पीडित रूग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतातही आता कोरोनाचे रूग्ण आढळायला लागल्याने देशात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सावधान! कोरोना दिल्लीत धडकलाय; भारतात पुन्हा आढळले दोन रुग्ण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले असून इतर देशांतही कोरोनाचा शिरकाव सुरू झाला आहे. भारताच्या राजधानी दिल्लीमध्येच आता कोरोना येऊन धडकला आहे. दिल्लीत एक कोरोनाबाधित रूग्ण सापडला असून तेलंगणा राज्यातही कोरोना पीडित रूग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतातही आता कोरोनाचे रूग्ण आढळायला लागल्याने देशात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Video: युवकाला शंभर तोफांची सलामी....

दिल्ली व तेलंगणामध्ये आलेले रूग्ण हे इटली व दुबई येथून आलेले आहेत. त्यामुळे या देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत भारतात ५ कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत, असे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. तसेच चीन, इराण, कोरिआ, सिंगापूर व इटली येथे गरज नसल्यास प्रवास करू नये असे आवाहनही हर्षवर्धन यांनी केले आहे. 

Nirbhaya Case:दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा, कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

दिल्ली व तेलंगणामध्ये सापडलेल्या रूग्णांची तब्येत स्थिर असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर दिल्लीच्या एअरपोर्टवर थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाला नसून यापूर्वी केरळमध्येही कोरोनाचे ३ रूग्ण आढळले होते. तर कोरोनाने चीनमध्ये तब्बल ३ हजार नागरिकांचा बळी घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आतापर्यंत कोरोना
चीन : ८०,०२६ रूग्ण, २९१२ मृत्यू
हाँगकाँग : ९४ रूग्ण, २ मृत्यू
मकाऊ : १० रूग्ण
साउथ कोरिया : ४२१२ रूग्ण, २२ मृत्यू
इटली : १६९४ रूग्ण, ३४ मृत्यू
ईराण : ९७८ रूग्ण, ५४ मृत्यू
जपान : ९६१ रूग्ण, १२ मृत्यू
फ्रान्स : १३० मामले, १ मृत्यू