esakal | धक्कादायक : देशात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Doctor

उत्तर प्रदेश या राज्यात 113 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तेलंगणा 96, तर राजस्थान 108, मध्य प्रदेश 99 आंध्र प्रदेश 86, गुजरात 82, तर जम्मू आणि कश्मीरमध्ये 62 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक : देशात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे, कोरोनाच्या संक्रमणापासून सामान्य नागरीकांबरोबरच डॉक्टर देखील दूर राहिलेले नाहीत. देशात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. एकट्या दिल्लीमध्ये सात डॉक्टरांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरांपैकी सफदरगंज येथील हॉस्पिटलमध्ये कोरोना पेशंटवर उपचार करत असलेल्या टीममधील एकास वैद्यकीय सेवा देत असताना कोरोनाची लागण झाली आहे. तर, जैवरसायन विभागात काम करत असलेल्या मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली महिला डॉक्टर कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ती काही दिवसांपूर्वी परदेशातून परत आलेली आहे.

- Fight with Corona : पुढील ४ आठवडे अत्यंत महत्त्वाचे; चिनी शास्त्रज्ञाचे मत

या दोन्ही प्रकरणात कोरोनाच्या तपासण्या केल्या गेल्या असता दोन्ही डॉक्टरांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दिल्ली सरकारने सुरू केलेल्या मोहल्ला क्लिनिकमधील दोन डॉक्टरांना तर, कॅन्सर सेंटरमध्ये काम करणार एक डॉक्टर देखील कोरोनाबाधित सापडले आहेत. तर AIIMSमधील एका वरिष्ठ डॉक्टरांना देखील कोरोना असल्याचे समोर आले आहे.

देशातील कोरोना व्हायरची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 1 हजार 965 वर पोहचली आहे तर, 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार आजपर्यंत 1 हजार 764 लोक कोरोना व्हायरस बाधित आहेत तर, 150 लोक हे बरे झाले आहेत उपचारांनंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. 

- युरोपमधल्या 'या' देशात 24 तासांत जगातील सर्वाधिक कोरोनाबळी!

कोरोना व्हायरसमुळे देशभरात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात रुग्ण दगावले आहेत. तर गुजरातमध्ये 6, मध्य प्रदेश 6, पंजाब मध्ये 4, कर्नाटक 3, तेलंगणा 3, प.बंगाल 3, दिल्ली 2, जम्मू-कश्मीर 2, उत्तर प्रदेश 2, केरळ 2, तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू, बिहार, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यात प्रत्येकी एक जण कोरोनामुळे दगावला आहे, तर देशात कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्र त्यानंतर केरळ 265, तमीळनाडू 234 लोकांना कोरोना झाला आहे.

- Coronavirus : तबलीगींच्या मौलानाने घेतला यू-टर्न; म्हणाला, 'मी स्वत: ...'

दिल्लीमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 219 वर पोहचली आहे. तर उत्तर प्रदेश या राज्यात 113 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तेलंगणा 96, तर राजस्थान 108, मध्य प्रदेश 99 आंध्र प्रदेश 86, गुजरात 82, तर जम्मू आणि कश्मीरमध्ये 62 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.