Fight with Corona : पुढील ४ आठवडे अत्यंत महत्त्वाचे; चिनी शास्त्रज्ञाचे मत

वृत्तसंस्था
Thursday, 2 April 2020

कोरोनाला आळा घालण्यासाठी काही देशांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत नवी लागण होणाऱ्यांचे प्रमाण कमी होणार आहे.

पेइचिंग : कोरोना व्हायरसने जगभरातील जवळपास दीडशेहून अधिक देशांना विळखा घातला आहे. युरोपमधील प्रमुख देशांमध्ये थैमान घातले असून युरोपीय नागरिकांचे सर्वाधिक बळी घेतले आहेत. यावर अजूनपर्यंत कोणतीही लस उपलब्ध झाली नसल्याने दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. येत्या काही दिवसांमध्ये जगाची काय परिस्थिती असेल, याविषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर चिनी शास्त्रज्ञाने आपले मत व्यक्त केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंतचा काळ सर्वाधिक महत्त्वाचा ठरणारा असल्याचे मत एका ज्येष्ठ चिनी शास्त्रज्ञाने व्यक्त केले आहे. जगभरात कोरोनाची परिस्थिती एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचेल. चीनमध्ये कोरोनाग्रस्तांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जात आहेत. त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याने चीनने कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे चीनमध्ये कोरोनाचा दुसऱ्यांदा उद्रेक होण्याची शक्यता कमी आहे, असे मत डॉ. झोंग नानशान यांनी व्यक्त केले. 

आणखी वाचा - अमेरिकेसाठी 9/11पेक्षा कोरोना घातक

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉ. झोंग म्हणाले की, 'कोरोना हा आतापर्यंत आढळून आलेल्या जीवघेण्या व्हायरसपैकी सर्वात जलद फैलाव होणारा व्हायरस आहे. तसेच यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे. याचा सामना करण्यासाठी सध्याच्या घडीला फक्त दोनच उपाय आहेत. ते म्हणजे, या व्हायरसचा संक्रमण होण्याचा दर शक्य तितका कमी करणे आणि कोरोनाची लागण होण्याला आळा घालणे. कारण त्याच्यावरील उपचारासाठी जास्त वेळ मिळू शकेल.'

- Coronavirus : तबलीगींच्या मौलानाने घेतला यू-टर्न; म्हणाला, 'मी स्वत: ...'

दुसरे म्हणजे, 'कोरोनाचा फैलाव होण्यामध्ये काही वेळेचं अंतर राखता आले, तर बराच फरक दिसून येईल. तसेच काही हटक्या उपायांनी कोरोनाग्रस्तांची संख्या कमी करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे. कोरोनाला आळा घालण्यासाठी काही देशांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत नवी लागण होणाऱ्यांचे प्रमाण कमी होणार आहे.' 'सायलेंट कॅरियर' ठरणाऱ्या काहीजणांमुळे कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे, याचे डॉ. झोंग यांनी खंडण केले.

- Coronavirus : भारतात कोरोनाचे थैमान सुरुच; मृतांची संख्या वाढतीये...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus will reach turning point in next four weeks says top chinese scientist