Coronavirus : तबलीगींच्या मौलानाने घेतला यू-टर्न; म्हणाला, 'मी स्वत: ...'

वृत्तसंस्था
Thursday, 2 April 2020

दिल्लीच्या तुकलकाबाद येथे या सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्याठिकाणीही ते बाहेर फिरताना दिसून आले. त्यांना विरोध करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांशीही त्यांनी हुज्जत घातली.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलीगींचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांपैकी काहींचा मृत्यूही झाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तबलीगी जमातच्या लोकांना 'मस्जिदव्यतिरिक्त चांगला मृत्यू इतर कुठेही नाही' असा धार्मिक पाठ शिकविणाऱ्या मौलाना सादलाही आता कोरोना व्हायरसची भीती वाटू लागली आहे. त्या धार्मिक कार्यक्रमानंतर गायब झालेल्या मौलानाचा नवी ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये साद स्वत: डॉक्टरांचं म्हणणं ऐकण्याचा सल्ला देत आहे. 

आणखी वाचा - अमेरिकेसाठी 9/11पेक्षा कोरोना घातक

सरकारला सहकार्य करा

तो पुढे म्हणाला की, मी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर स्वत:ला आयसोलेशन करून घेतलं आहे. डॉक्टरांचा सल्ला ऐकणं हे शरियतला विरोध करण्यासारखं नाही. तबलीगींचा मौलाना असलेल्या सादची ऑडिओ क्लिप दिल्ली मरकजच्या यू-ट्यूब पेजवर आहे. तशीच ती सोशल मीडियात व्हायरलही झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये मौलाना सादने म्हटले आहे की, तबलीगी जमातीतील सर्वांनी सरकारला सहकार्य करायला पाहिजे. तसेच डॉक्टरांचाही सल्ला ऐकला पाहिजे. यापुढे लोक जमा होतील, अशा प्रकारचा कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नये.

आणखी वाचा - कच्चे तेल झाले पाण्या पेक्षा स्वस्त, दर वाचून आश्चर्य वाटेल!

या आधी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये सादने डॉक्टरांबाबत म्हटले होते की, सल्ला त्याच डॉक्टरचा घ्या, जो स्वत: अल्लाहवर विश्वास ठेवतो. कोरोनाला आळा घालण्यासाठी दिल्ली राज्य सरकारने जमावबंदी तसेच संचारबंदी लागू केली होती. तेव्हा मस्जिदमध्ये लोकांना जमण्यास विरोध केला जात होता. मात्र, मस्जिदमध्ये आल्यावर कोरोनामुळे मृत्यू होत असेल, तर यापेक्षा सर्वात चांगली जागा कोणती नाही, असेही सादने म्हटले होते. 

- Coronavirus : भारतात कोरोनाचे थैमान सुरुच; मृतांची संख्या वाढतीये...

तबलीगी सहकार्य करणार का?

दरम्यान, तबलीगी जमातीतील लोक उपचार करण्यास विरोध करत होते, त्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही चिंतेत पडले होते. दिल्लीच्या तुकलकाबाद येथे या सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्याठिकाणीही ते बाहेर फिरताना दिसून आले. त्यांना विरोध करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांशीही त्यांनी हुज्जत घातली. मात्र, सादने डॉक्टरांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डॉक्टरांना विरोध करणे चुकीचं आहे, असंही सादनं म्हटलं आहे. त्यामुळे आता उपचारांसाठी तबलीगी खरंच डॉक्टरांना सहकार्य करतील का? याकडे सर्वांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tablighi jamaat maulana saad comment about quarantine and doctors advice