24 तासांत 54,069 नवे रुग्ण; सहा राज्यांत 80 टक्के नवीन रुग्ण

24 तासांत 54,069 नवे रुग्ण; सहा राज्यांत 80 टक्के नवीन रुग्ण

Coronavirus in india, covid-19, latest updates : भारतात कोरोनाचे रुग्ण घटत आहेत. मात्र, डेल्टा प्लस व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. भारतामध्ये आतापर्यंत 40 डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. एकट्या महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आढळले आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये पाच रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी कोरोना रुग्ण संख्येमध्ये किंचीतशी वाढ पाहायला मिळाली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दररोज वाढणारी रुग्णसंख्या पुन्हा एकदा 50 हजारांच्या पुढे गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी देशात 54,069 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार 321 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 68 हजार 885 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 96.61 टक्केंवर पोहचला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3.04 टक्के इतका आहे. दर दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट 2.91 टक्के आहे.

देशातील सध्याची कोरोना स्थिती -

एकूण रुग्ण (Total cases) : 3,00,82,778

उपचाराधीन रुग्ण (Active cases) : 6,27,057

एकूण कोरोनामुक्त (Total recoveries) : 2,90,63,740

एकूण मृत्यू (Death toll) : 3,91,981

एकूण लसीकरण (Total vaccination) : 30,16,26,028

24 तासांत 54,069 नवे रुग्ण; सहा राज्यांत 80 टक्के नवीन रुग्ण
राज्यात पुन्हा कडक निर्बंध?; दोन दिवसांत निर्णय

देशातील सहा राज्यांत बुधवारी आढललेले 80 टक्के रुग्ण आहेत. या राज्यांमध्ये केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. या सहा राज्यांत बुधवारी 40 हजार 421 नवीन रुग्ण आढळले आहेत. जे एकूण रुग्णांच्या 80 टक्के आहेत. बुधवारी केरळमध्ये 12,787, महाराष्ट्रात 10,066, तामिळनाडूमध्ये 6,596, आंध्रप्रदेशमध्ये 4,684, कर्नाटकमध्ये 4,436 आणि पश्चिम बंगालमध्ये 1,852 नवीन रुग्ण आढळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com