
मुळात भारतात आढळलेले बहुतांश कोरोनाग्रस्त हे विदेशी आहेत किंवा विदेशात जाऊन भारतात परतलेले भारतीय आहेत.
नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता, भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोनाग्रस्त वाढती संख्या लक्षात घेता, भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात प्रवेश करण्यासाठी यापूर्वी देण्यात आलेले सर्व व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. येत्या 15 एप्रिलपर्यंत कोणत्याही विदेशी पर्यटकाला किंवा नागरिकाला भारतात प्रवेश देण्यात येणार नाही. मुळात भारतात आढळलेले बहुतांश कोरोनाग्रस्त हे विदेशी आहेत किंवा विदेशात जाऊन भारतात परतलेले भारतीय आहेत. त्यामुळं भारतानं विदेशी नागरिकांना प्रवेश नाकारला आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असताना भारतातही काही भागात कोरोनाचा प्रसार होऊ लागला आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाचे दहा रुग्ण आढळून आले असून त्यात सर्वाधिक रुग्ण केरळचे आहेत. तसेच या रुग्णात इटलीच्या १६ जणांसह दिल्ली आणि राजस्थानचे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, कर्नाटकातील कलबुर्गी येथील एका ज्येष्ठाचा मृत्यू झाला असून तो करोनाचा पहिला बळी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. तो कोरोनाचा बळी नसल्याचे म्हटले आहे.
कोरोना अपडेट
आणखी वाचा - महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली दहावर
देशभरातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा
उत्तर प्रदेशात 9 जणांना लागण
दिल्लीतील पाच जणांना बाधा झाल्याचे उघड झाले असून उत्तर प्रदेशातील नऊ जणांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. त्यामुळे बाधितांची संख्या ५२ वर पोचली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनुक्रमे चार आणि दोघांना बाधा झाली आहे. लडाख येथे दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. राजस्थान, तेलंगण, तामिळनाडू, जम्मू काश्मीर आणि पंजाब येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. केरळमध्ये आतापर्यंत नऊ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी तिघांना मागील महिन्यात घरी सोडले आहे. दुबईहून जयपूरला परतलेल्या ज्येष्ठ नागरिकास कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. या व्यक्तीचा दुसरा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. चीन, हॉंगकॉंग, रिपब्लिक ऑफ कोरिया, जपान, इटली, थायलंड, सिंगापूर, इराण, मलेशिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी येथे प्रवास करुन आलेल्या प्रवाशांनी स्वत:च वेगळे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांना चौदा दिवस वेगळे ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान कंपन्यांनी वर्क फ्रॉमची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे आरोग्य मंत्रालयाने आदेश दिले आहेत.
आणखी वाचा - निर्भयाच्या दोषींचा मीडिया इंटरव्हू होणार; तिहार जेल देणार निर्णय