देशात कोरोनाचा कहर; राज्यात नव्या रुग्णांच्या आकड्याने गाठला उच्चांक

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 30 August 2020

महाराष्ट्रात शनिवारी एका दिवसात 16 हजार 867 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत, हा आकडा भारतातील आतापर्यंचा उच्चांक ठरला आहे. तसेच मागील 24 तासांत 11 हजार 541 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला देशासह महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव ओसरतानाचे चित्र पाहायला मिळाले होते. याकाळात कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर काही प्रमाणात कमी झाला होता. पण मागील 3 दिवसांपासून कोरोनाने देशात खूप बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. सलग 3 दिवस प्रत्येक दिवशी भारतात 75 हजारांच्या वर नवे रुग्ण आढळले  आहेत. मागील 24 तासांत देशात 76 हजार 472 रुग्ण आढळले आहेत, त्यामू्ळे देशातील कोरोना झालेल्यांचा आकडा 34 लाखांच्या वर गेला आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने  (Ministry of Health and Family Welfare ) दिली आहे. तसेच मागील 24 तासांत 1,021 कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे, आतापर्यंत भारतात कोरोनाने  62 हजार 550 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

होयबांची सरशी (श्रीराम पवार)

 आतापर्यंत भारतात 34 लाख 63 हजार 973 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील 26 लाख 48 हजार 999 रुग्ण कोरोनातून सावरले आहेत, त्यामूळे भारतात रुग्ण बरं होण्याच्या प्रमाणाचा टक्का 76.47 वर गेला आहे. तरीही भारतात सध्या 7 लाख 52 हजार 973 रुग्ण कोरोना सक्रिय आहेत. काळजी करण्यासारखी बाब म्हणजे 7 ऑगस्ट ते 29 ऑगस्टपर्यंत 14 लाखांच्या वर रुग्ण वाढले आहेत. तसेच  एकट्या पुण्यात मागील 24 तासांत 4,007 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

अनलॉक-4: 169 दिवसानंतर मेट्रो धावणार, जाणून घ्या केंद्र सरकारची नवी नियमावली

महाराष्ट्रात शनिवारी एका दिवसात 16 हजार 867 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत, हा आकडा भारतातील आतापर्यंचा उच्चांक ठरला आहे. तसेच मागील 24 तासांत 11 हजार 541 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामूळे राज्यात आतापर्यंत 5 लाख 54 हजार 711 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरं होण्याचा टक्का 72.58 वर गेला आहे. सध्या राज्यात 1 लाख 85  हजार 131 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू असून शनिवारी एका दिवसात राज्यात 328 कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.  

विश्लेषण : कोरोनाचा लॉकडाऊन म्हणजे सरकारची आंधळी कोशिंबिर?

जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत दिल्लीत कोरोना चांगलाच अटोक्यात आला होता. पण आता दिल्लीत कोरोनाची वापशी झाली आहे. मागील 24 तासांत  दिल्लीत 1954 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतील ही एका दिवसातील कोरोनाची वाढ आतापर्यंतची सर्वाधिक ठरली आहे. यामूळे आता दिल्लीत कोरोना झालेल्यांचा आकडा 1.78 लाखांवर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिल्लीत कोरोनाचे रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 90 टक्क्यांच्या वर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus India News Updates India Reports Over 76000 COVID19 Cases In 24 Hours