esakal | कोरोना अपडेट्स; जाणून घ्या देशात कुठं काय घडलं?
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus india update information marathi 276 people affected

दक्षिण अफ्रिकेहून परतलेल्या तरुणांना त्याच्या शेजाऱ्यांनी फ्लॅटमध्ये कोंडून घातल्याची बातमी समोर आली आहे.

कोरोना अपडेट्स; जाणून घ्या देशात कुठं काय घडलं?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : देशात कोरोना व्हायरसची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या इटली, इराणच्या तुलनेत कमी आहे. त्याचा वेगही मंद आहे. पण, देशावरील संकट टळलेले नाही. काळजी घ्यावीच लागणार आहे, असे स्पष्ट चित्र सध्या देशातील परिस्थितीमुळं दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (22 मार्च) जनता कर्फ्यूचं आवाहन केलंय. कोरोनाशी लढताना या प्रयोगाच्या यशस्वीतेकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कानिका कपूरच्या पार्टीतील लोकांचं काय?
बेबी डॉल मै सोने दी, या गाण्याची पार्श्वगायिका कानिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. कानिका ही लंडनहून भारतात आली त्यानंतर तिनं लखनौमध्ये एक इव्हेंट केला होता. त्या इव्हेंट पार्टीमध्ये उत्तर प्रदेशातील मंत्र्यांसह अनेक बड्या हस्ती उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह त्या पार्टीत हजर होते. अशा बड्या 28 हस्तीची कोरोना चाचणी करण्यात आली. लखनौतील किंग जॉर्ज मेडिकल विद्यापीठात ही चाचणी करण्यात आली. त्यात जय प्रतापसिंह यांच्यासह 28 जण निगेटिव्ह आढळले आहेत. 

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अफ्रिकेतून आलेल्या तरुणाला शेजाऱ्यांनी कोंडले
दक्षिण अफ्रिकेहून परतलेल्या तरुणांना त्याच्या शेजाऱ्यांनी फ्लॅटमध्ये कोंडून घातल्याची बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये हा प्रकार घडला असून, संबंधित तरुणाने पोलिस स्टेशनमध्ये कॉल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत बंजारा हिस्स पोलिसांनी माहिती दिली आहे. संबंधित तरुण दक्षिण अफ्रिकेतून परतल्याचे समजल्यानंतर, शेजाऱ्यांनी त्याला कोंडून घातले आहे. विदेशातून जाऊन आलेल्यांना 14 दिवस वेगळे राहण्याच्या, सार्वजनिक समारंभात सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळं शेजाऱ्यांनी पुढाकार घेत संबंधित तरुणाला कोंडून घातले आहे.

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रात आजही सर्वाधिक रुग्ण
राज्यात एका दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11ने वाढली आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्ण 63 झाले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. नव्यानं लागण झालेल्या 11 जणांमध्ये 8 जण विदेशात प्रवास करून आले आहेत. तर, इतर तिघा जणांना अशा प्रवाशांच्या संपर्कात आल्यानं कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

आणखी वाचा - ट्रम्प म्हणतात, 'चीनच्या चुकांची किंमत जग मोजतंय'

रेल्वेचे आठ प्रवासी पॉझिटिव्ह
दिल्लीहून आंध्र प्रदेश संपर्क क्रांती एक्स्प्रेसने प्रवास केलेले आठ जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या सगळ्यांनी 13 मार्च रोजी दिल्लीहून रामागुंडम येथे प्रवास केला होता. याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालयाने ट्विटर द्वारे दिली आहे. रेल्वे विभागाने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संसर्ग टाळण्यासाठी आणि कोरोनाची लागण इतरांना होऊ नये म्हणून, नागरिकांनी प्रवास टाळाला, असं आवाहन खुद्द रेल्वे मंत्रालयानच केलंय.

देशात आज काय घडले?

  • देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 276वर
  • देशभरात आज दुपारपर्यंत 22 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट
  • काल शुक्रवारी दिवसभरात देशात सर्वाधिक 63 जण ठरले पॉझिटिव्ह
  • महाराष्ट्रात, मुंबई, पुणे, नागपुरातून उत्तर भारतीय परतू लागले
  • महाराष्ट्रातील महानगरांमध्ये रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी
  • राजधानी एक्स्प्रेसमध्ये कोरोनाची संशयित रुग्ण सापडला
  • नोएडामध्ये सेक्टर 74मधील रहिवासी सोसायटी केली बंद
  • पुढील 48 तास रहिवासी सोसायटी राहणार बंद