esakal | कोरोनामुळं देशात अभूतपूर्व स्थिती; रस्त्यांवर दिसणार शुकशुकाट, अनेक राज्यांत टाळेबंदी
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus india update malls theatres will shut down many states

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, हरियाना, ओडिशा, छत्तीसगड, दिल्ली या राज्यांनीही शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेत सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. 

कोरोनामुळं देशात अभूतपूर्व स्थिती; रस्त्यांवर दिसणार शुकशुकाट, अनेक राज्यांत टाळेबंदी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फोफावू लागल्याने आता केंद्राप्रमाणेच विविध राज्यांनीही टाळेबंदीचा मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा पहिला बळी गेलेल्या कर्नाटक सरकारने आज राज्यातील मॉल्स, सिनेमागृहे, पब्ज आणि नाइट क्लब आठवडाभरासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळं देशात अभूतपूर्व स्थिती; अनेक राज्यांत टाळेबंदी

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, हरियाना, ओडिशा, छत्तीसगड, दिल्ली या राज्यांनीही शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेत सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. केरळमध्ये विधिमंडळाचे कामकाज तहकूब करण्यात आले असून, राज्यातील नऊशे जणांना विलगीकरण कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा - पवारांच्या शब्दाला वजन, एका पत्रावर नेत्याची नजरकैदेतून सुटका

इराणमधील भारतीय परतू लागले
कोरोनाग्रस्त इराणमध्ये सहा हजार भारतीय अडकून पडले असून, त्यांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आज ४४ भारतीयांचा दुसरा जत्था मायदेशी परतल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. दुसरीकडे देशातील विषाणूबाधितांची संख्या ८१ वर पोचली आहे. इटलीमधून मायदेशी परतलेल्या एका नागरिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्याला लष्कराच्या मानेसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा - गुगलला कोरोनाची दहशत, कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

उत्तर प्रदेशात 22 मार्चपर्यंत शाळा बंद
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध उपाययोजनांची घोषणा केली. राज्यातील शैक्षणिक संस्था आणि शाळा २२ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या असून प्रत्येक जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. जम्मू- काश्मीरमध्येही सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद करण्यात आले असून, वॉटर पार्क आणि अंगणवाड्यादेखील ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. राजधानी दिल्लीमध्ये खासगी शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद केली ठेवली जाणार असून, सिनेमागृहे महिनाभरासाठी बंद ठेवण्यात येतील. पंजाबमध्ये भारत- पाकिस्तान दरम्यानच्या अटारी- वाघा सीमेवरून कोणत्याही परदेशी नागरिकास आता देशात सोडले जाणार नसून, पाकमधील भारतीयांनाही त्यांच्या व्हिसाची मुदत संपण्यापूर्वीच मायदेशी परतावे लागले.

आणखी वाचा - मोठी बातमी; पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील शाळा बंद  

देशात काय घडले?

  • सरकार पुढील आठवड्यात संसद अधिवेशन गुंडाळणार 
  • सर्वोच्च न्यायालयातही कामकाजावर मर्यादा 
  • आयपीएल सामने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलले 
  • भारत- दक्षिण अफ्रिकेदरम्यानची वन डे सीरिज रद्द 
  • मराठी नाट्य संमेलनावरही तात्पुरता पडदा 
  • देशभरातील लष्कर भरतीला स्थगिती 
  • भारत- बांगलादेशदरम्यानची बस, 
  • रेल्वे सेवा १५ एप्रिलपर्यंत स्थगित