कोरोना संदर्भात भारतात दिलासा; पाहा काय घडले!

टीम ई-सकाळ
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

भारतात केरळमध्ये सर्वाधिक कोरोना संशयित रुग्ण आहेत. हे सर्व संशयित रुग्ण चीनहून परतले आहेत. त्यामुळं या सगळ्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय.

कोची (केरळ) : चीनमध्ये कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. भारतानं याची गंभीर दखल घेऊन चीनमधील भारतीयांना माघारी आणलं. पण, भारतात परतलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता. त्यात केरळमधील पहिल्या करोनाग्रस्त संशयित तरुणीची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळं भारतीयांना दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतात केरळमध्ये सर्वाधिक कोरोना संशयित रुग्ण आहेत. हे सर्व संशयित रुग्ण चीनहून परतले आहेत. त्यामुळं या सगळ्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. चीनमधील कोरोनाग्रस्त हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहानमधून एक तरुण विद्यार्थीनी त्रिशूरला परतली होती. तिला कोरोनाची लागण झाल्याच संशय होता. भारतातील ती पहिली कोरोना संशयित महिला होती. तिच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यात तिची चाचणी निगेटिव्ह असल्याचं निष्पन्न झालंय. केरळच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. त्या तरुणीची प्रकृती स्थीर असल्याचं सांगण्यात आलंय. केरळमध्ये सध्या 34 कोरोना संशयित रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अलप्पुझामधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हयरॉलॉजीमध्ये संबंधित तरुणीची रक्त चाचणी निगेटिव्ह आली होती. पण, आम्हाला पुण्यातील लॅबमधून याची खात्री हवी होती, असं वैद्यकीय अधिकाऱ्यानं पीटीआयशी बोलताना सांगितलं.

आणखी वाचा - सातारची कन्या अडकली, कोरोनाग्रस्त वुहानमध्ये 

आणखी वाचा - एक किस तुम्हाला पाडू शकतो भयंकर आजारी

34 जणांवर विशेष लक्ष
केरळमध्ये एकूण 3 हजार 252 लोकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. यातील 3 हजार 218 जण घरातच उपचार घेत आहेत. केरळमधून आतापर्यंत पुण्यातील लॅबमध्ये 345 जणांच्या रक्तांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यातील 326 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. सध्या केरळमध्ये केवळ 34 जणांच्या प्रकृतीवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. जर केरळमध्ये कोणालाही कोरोनाची लागण झालेली नसेल तर, भारतात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसल्याचे स्पष्ट होत आहे.

coronavirus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus kerala girl tested negative thrissur china