Coronavirus:भारतातही कोरोनाचा धोका; मलेशियाहून परतलेल्या रुग्णाचा मृत्यू

Coronavirus in India
Coronavirus in India

कोची : कोरोना व्हायरसची (कोविड-१९) चाचणी नकारात्मक आलेल्या ३६ वर्षीय रुग्णाचा शुक्रवारी रात्री एर्नाकुलम येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मलेशियाहून परतल्यानंतर कोरोनाची लक्षणे आढळल्याने या रुग्णाला एर्नाकुलम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचा मृतदेह अद्याप रुग्णालयातच ठेवण्यात आला असून, संबंधित रुग्णाची दुसऱ्यांदा कोरोनाची चाचणी करण्यासाठी नमुने अलाप्पुझा येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. या रुग्णाची कोरोनाची पहिली चाचणी नकारात्मक आली होती. मृत्युमुखी पडलेली व्यक्ती कन्नुरची रहिवासी आहे. तो मलेशियातून गुरुवारी रात्री कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला होता. त्यानंतर फुप्फुसाचा दाह झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला नंतर विलगीकरण कक्षात हलविण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्यानंतर त्याला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. एर्नाकुलममधील रुग्णालयातील विलगीकरण कक्षात शुक्रवारी दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले, तर २८ रुग्णांना त्यांच्या घरातच वेगळे ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com