DelhiRiots:हिंदू तरुणांनी अशी वाचवली, मुस्लिम व्यापाऱ्यांची दुकानं!

टीम ई-सकाळ
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

गलीच्या आघातानं भयभीत झालेली ही कुटुंब आता आपल्या घरी पतरण्यालाही घाबरत आहेत. पोलिस आणि सरकारकडून कोणतिही आशा राहिलेली नाही, अशी प्रतिक्रिया ते व्यक्त करत आहेत.

नवी दिल्ली : काँटो, मारो, जला डालो, अशा घोषणा दिल्या जात होत्या. दोन धर्मातील लोक एकमेकांचे मुडदे पाडायला निघाले होते. पण, त्यातही एक आशेचा किरण होता. ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनांचे अनेक प्रसंग सध्या वाचायला मिळत असले तरी, त्यात वेदना देणाऱ्या प्रसंगांची संख्या जास्त आहे. पण, शिव विहार, इंदिरा विहारमधलं चित्र मात्र निश्चित तमाम देशवासियांनी दिलासा देणारं आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडलं नेमकं?
या संदर्भात एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य दिल्लीत इंदिरा विहारमध्ये एका मुस्लिम बहुल भागात 3-4 हिंदू कुटुंबे राहत आहेत. कुटुंबांसाठी ढाल बनण्याचं काम, तेथील मुस्लिम कुटुंबांनी केलं. त्या परिसरात एक शिव मंदिर आहे. मुस्लिमांनी संतप्त जमावापासून या मंदिराचंही रक्षण केलं. शिव विहारमधील अनेक मुस्लिमांनी इंदिरा विहारमध्येच आपलं तात्पुरतं वास्तव्य केलंय. दंगलीच्या आघातानं भयभीत झालेली ही कुटुंब आता आपल्या घरी पतरण्यालाही घाबरत आहेत. पोलिस आणि सरकारकडून कोणतिही आशा राहिलेली नाही, अशी प्रतिक्रिया ते व्यक्त करत आहेत. दुसरीकडं शिव विहारपासून किमान 300 मीटर अंतरावर जौहरीपूर परिसर आहे. त्या परिसरातील मुस्लिम व्यवसायिकांची दुकानं वाचवण्याचं काम हिंदू तरुणांनी केलं. जमाव जाळपोळ करण्यासाठी येत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुस्लिम व्यवसायिकांच्या दुकानांचे फलक उतरवले. दुकानाचा मालक मुस्लिम आहे हे, संतप्त जमावाच्या लक्षात येऊ नये यासाठी धावपळ करण्यात आली. यातून मुस्लिमच नव्हे तर, इतर परिसरातील हिंदू दुकानंही वाचली आहेत.

आणखी वाचा - दिल्लीत मेट्रो स्टेशनवर 'देश के गद्दारोंको गोली मारो' घोषणा

आणखी वाचा - कन्हैय्या कुमारवर देशद्रोहाचा खटला

दंगलीत 42 जणांचा बळी
आतापर्यंत दिल्लीतील हिंसाचारात 42 जणांचा बळी गेला आहे तर, जवळपास 300हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. काही जण बेपत्ता आहेत. दिल्ली पोलिस या बेपत्ता लोकांचा तपास करत आहे. या हिंसाचारात पोलिस कॉन्स्टेबल रतन लाल, गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित शर्मा हुतात्मा झाले आहेत. यातील रतनलाल यांना हुतात्मा घोषित करण्यात आले आहे. तर, अंकितच्या कुटुंबाने तशी मागणी केलीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi riots hindu families saved muslim families and their shops