तबलिगी जमातीच्या कार्यक्रमावर नुसरत जहाँ संतापली...

वृत्तसंस्था
Thursday, 2 April 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशाने लॉकडाऊन केला आहे. मात्र, दिल्लीच्या तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमानंतर टीएमसी खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ संतापली आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशाने लॉकडाऊन केला आहे. मात्र, दिल्लीच्या तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमानंतर टीएमसी खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ संतापली आहे.

...म्हणून बाळाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'

एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाली की, 'देशात अनेक धर्म आहे. मात्र, कोणत्याही धर्माने अशाप्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केले नाही. मरकज प्रकरणाने आपल्याला खूप मागे आणले आहे. हे कृत्य सहन करण्यापलीकडे आहे. कोणताही आजार धर्म, गरीब-श्रीमंत बघून हल्ला करत नाही. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते, आज देश ज्या संकटातून जात आहे अशावेळी आपल्याला राजकारण, धर्म आणि जातीबाबत बोलणे बंद केले पाहिजे. धर्म नंतर येईल पण सावधान राहणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आताची वेळ संवेदनशील आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, या कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तुम्हाला घरातच राहून सुरक्षित राहायला लागेल.'

पोलिसाला सलाम; 450 किमी चालत कामावर हजर

दरम्यान, दिल्लीत लॉकडाऊन असूनही निजामुद्दीन येथील तबलिगी मरकजच्या कार्यक्रमात २ हजारांपेक्षा अधिक लोक एकत्र आले होते. यामुळे सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. यातील ९०० जण महाराष्ट्रात परतले आहेत. तर ३३४ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. ७०० जणांना क्वारंटाईन केंद्रात पाठवले आहे. मलेशिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, किर्गिझस्तान यांच्यासह २,००० हून अधिक प्रतिनिधींनी निजामुद्दीन येथे असलेल्या मरकजमध्ये १ ते १५ मार्च दरम्यान धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमातून देशातील वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षण समोर आली आहेत. मरकजमधील २४ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

देशात आणीबाणी लागू करा, लष्कर बोलवाः ऋषी कपूर

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना दिल्लीच्या तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमामुळे अनेक स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी मौलाना साद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या मौलाना फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus mp nusrat jahan reaction delhis tbiligi tribes programe markaj