पोलिसाला सलाम; 450 किमी चालत कामावर हजर...

वृत्तसंस्था
बुधवार, 1 एप्रिल 2020

देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्यामुळे एक पोलिस चक्क 450 किलोमीटर अंतर पायी चालत कामावर हजर झाला आहे. संबंधित पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिग्विजय शर्मा (वय 22) असे बहादूर पोलिसाचे नाव आहे.

भोपाळ (मध्य प्रदेश): देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्यामुळे एक पोलिस चक्क 450 किलोमीटर अंतर पायी चालत कामावर हजर झाला आहे. संबंधित पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिग्विजय शर्मा (वय 22) असे बहादूर पोलिसाचे नाव आहे.

देशात आणीबाणी लागू करा, लष्कर बोलवाः ऋषी कपूर

देशात कोरोना व्हायसने धुमाकूळ घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात लॉकडाऊन सुरू केला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिस डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र रस्त्यावर तैनात आहेत. नागरिकांना आहे त्या ठिकाणी थांबविण्यासाठी पराकाष्टा करताना दिसत आहेत. देशाची सेवा करण्यासाठी दिग्विजय शर्मा हे तब्बल 450 किमी अंतर पायी चालत कामावर हजर झाले आहे.

Video लय भारी; क्रिकेटचा असा खेळ कधी पाहिलाच नसेल...

दिग्विजय 16 मार्च रोजी परीक्षेसाठी 24 मार्चपर्यंत सुट्टी घेऊन आपल्या इटावा (उत्तर प्रदेश) गावी गेले होते. या दरम्यान 25 मार्च रोजी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सर्व परीक्षाही रद्द केल्या. लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक व्यवस्था बंद झाली होती. त्यामुळे चालत ते नोकरीच्या ठिकाणी निघाले होते. दिग्विजय म्हणाले, "मी 24 मार्च रोजी सकाळी इटावावरुन पायी चालत निघालो होतो. मी जवळपास 20 तास चालत 450 किमी अंतर पार केले. प्रवासादरम्यान रस्त्यात नागरिकांनी मदत करत गरजेचे वस्तूही दिल्या."

Video: ट्रकमधील पीठाची पोती लुटण्यासाठी झुंबड...

पोलिस अधिक्षक प्रदीम शर्मा म्हणाले, 'दिग्विजय कामावर हजर होण्यासाठी चालत आला आहे. त्याचा इतरांनी आदर्श घेतला पाहिजे. पोलिसांमध्येही दिग्विजयच्या या कामगिरीमुळे उत्साह निर्माण झाला आहे. दिग्विजयचा आम्ही सत्कारही केला आहे."

Video:नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cop travels 450 km from up to mp to join duty