नवीन रुग्णसंख्या 2.5 लाखांच्या खाली, मृताची संख्या 3 लाख

कोरोना
कोरोना

Coronavirus in India, Covid-19, Latest Updates : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा वेग भारतात कमी होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार शनिवार भारतात को 2 लाख 40 हजार 842 नवीन कोरोना रुग्ण आढळले. देशात 35 दिवसानंतर पहिल्यांदाच इतक्या कमी रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी 16 एप्रिल रोजी दोन लाख 34 हजार कोरोना रुग्ण आढळले होते. एकीककडे रुग्णांची संख्या घटत असली तरीही मृताच्या संख्या वाढतच आहे. मृताच्या संख्येनं सर्वांचीच चिंता वाढली आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनामुळे 3,741 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधी तीन लाख 55 हजार 102 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र, मृताची संख्या दररोज वाढतच आहे. देशातील एकूण मृताची संख्या तीन लाखांच्या घरात पोहचली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जवळपास 19 राज्यात कडक लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. तर 13 राज्यात आंशिक लॉकडाउन लावण्यात आलेला आहे.

कोरोना
साहेब, एकदाच चेहरा बघू द्या ना! कोरोनाग्रस्त मृताच्या नातेवाईकांची आर्त हाक 

देशातील कोरोना स्थिती -

एकूण कोरोना रुग्ण : 2,65,30,132

एकूण कोरोनामुक्त : 2,34,25,467

एकूण मृताची संख्या : 2,99,266

उपचाराधीन रुग्ण : 28,05,399

एकूण लसीकरण : 19,50,04,184

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com