'मोबाइल स्क्रीन, नोटेवर 28 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो कोरोना विषाणू'

पीटीआय
Monday, 12 October 2020

20 डिग्री सेल्सियस तापमानावर कोरोनाचे विषाणू ग्लास, स्टील, नोट आणि मोबाइल स्क्रीनवर 28 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात, असा दावा ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी केला आहे. कोरोना विषाणू फ्लूच्या विषाणूमुळेही जास्त काळापर्यंत जिवंत राहतात. कोरोना विषाणूपासून वाचायचं असेल तर सातत्याने हात धुणे आणि घरातील साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला देखील या संशोधकांनी दिला आहे.

नवी दिल्ली - 20 डिग्री सेल्सियस तापमानावर कोरोनाचे विषाणू ग्लास, स्टील, नोट आणि मोबाइल स्क्रीनवर 28 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात, असा दावा ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी केला आहे. कोरोना विषाणू फ्लूच्या विषाणूमुळेही जास्त काळापर्यंत जिवंत राहतात. कोरोना विषाणूपासून वाचायचं असेल तर सातत्याने हात धुणे आणि घरातील साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला देखील या संशोधकांनी दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्हायरालॉजी जर्नलमध्ये प्रकाशित या ताज्या शोधात ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल साइंड एजन्सी सीएसआयआरओच्या संशोधकांनी म्हटले की, 20 डिग्री सेल्सियस तापमानावर सार्स-कोव्ह-2 विषाणू 28 दिवसांपर्यंत प्लास्टिक बँक नोट आणि मोबाइल फोनच्या स्क्रीनवर 28 दिवसांपर्यंत राहतो. त्याच्या तुलनेत इन्फ्लुऩजा अ विषाणूच्या तुलनेत पृष्ठभागावर 17 दिवसांपर्यंत जिवंत राहतो.

धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या युवकास गुजरातमधून अटक 

हा प्रयोग 20, 30 आणि 40 डिग्री सेल्सियसवर करण्यात आला. यामध्ये जसजसे तापमान वाढत जाते, त्याप्रमाणे कोरोना विषाणू जिवंत राहण्याची शक्यता कमी होते. कोरोना विषाणू किती काळापर्यंत पृष्ठभागावर जिवंत राहतो, याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या जिवंत राहण्याचा अचूक अंदाज लावण्यासाठी, त्याचा प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी आमचे संशोधन मदत करेल, असे सीएसआयआरओचे सीईओ लॅरी मार्शल यांनी म्हटले.

Corona Updates: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 71 लाखांच्या वर

शरीरातील प्रोटीन आणि फॅट विषाणू जिवंत राहण्याची क्षमता वाढवतात, असे शोधकर्त्यांनी म्हटले आहे. हा शोध कोरोना विषाणू सततच्या थंड वातावरणात जिवंत राहणे आणि प्रसाराचे कारण समजण्यासाठी मदतीचा ठरेल. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा सामना कसा करावा हे समजण्यासाठीही मदत करेल, असे ऑस्ट्रेलियातील सेंटर फॉर डिसीजच्या शास्त्रज्ञ ट्रेवोर ड्रीव्ह यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus remain 28 Days On Glass mobile screen Currency Australian Study