Coronavirus Vaccination : बलिदान देणाऱ्या कोरोना योद्धांच्या आठवणीने PM मोदी भावूक

Coronavirus Vaccination PM Modi gets emotional over the memory of Corona Warriors who sacrificed
Coronavirus Vaccination PM Modi gets emotional over the memory of Corona Warriors who sacrificed

पुणे : जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी कोरोनाकाळात कोरोग्रस्तांची सेवा करताना जीव गमावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आठवणीने पंतप्रधान मोदी भावूक झाले.''कोरोना काळात शेकडो साथी असे होते ज्यांनी स्वत:च्या प्राणांची आहूती देत दुसऱ्यांचे प्राण वाचवले. या कोरोना युद्धांच्या बलिदानाला माझा सलाम आहे. '' असे सांगत त्यांचा कंठ दाटून आला.

पहिल्या टप्प्यात दिल्ली व महाराष्ट्रासह १६ राज्यांतील लाखो डॉक्‍टर व आरोग्य सेवकांना लसीकरण करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ''आज कोरोनाचे लसीकरण प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना देऊन त्यांचे हे ऋण फेडण्याचा प्रयत्न करुन या.''


कोरोना महामारीवरील देशव्यापी लसीकरणास आजपासून (ता.१६) देशातील १६ राज्यांत प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान मोदीं यांच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा झाला. सर्वात मोठ्या लसीकरणाचा मुंबईतून शुभारंभ झाला. त्यानंतर AIIMS हॉस्पिटलमधील सफाई कर्मचाऱ्याला कोव्हिड 19 ची पहिली लस देण्यात आली  केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यावेळी उपस्थित होते. 

''कोरोना महामारीवर मात करणाऱ्या या कोरोना लसीची प्रतीक्षा खूप दिवसांपासून सर्वांना होती. सर्व प्रथम कोरोना युद्धांना लस दिली जाणार असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च सरकार उचलणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करताना दिली.
 
दोन्ही कोराना लशी सुरक्षित, अफवांपासून सावध राहा; PM मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

तसेच, ''एवढ्या व्यापक स्वरुपात कोणीच अशी लसीकरण मोहीम केली नाही. जगात 100 हून अधिक देश आहेत ज्यांची लोकसंख्या 3 करोड पेक्षा कमी आहे आणि भारतात पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांसाठी लसीकरण मोहीम राबवित आहे.आपल्याला हा आकडा 30 कोटी पर्यंत पोहचवयाचा आहे.  भारताची लस दुसऱ्या देशांच्या लसीपेक्षा स्वस्त आहे.'' असे सांगाताना त्यांनी लस घेतल्यानंतर सावधगिरी बाळगली पाहिजे असे आवाहनही केले. लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, हात धूणे गरजेचे आहे असल्याचीही त्यांनी यावेळी सांगितले. 

''लसीकरणासाठी सर्व राज्यांकडून मदत मिळाली. भारतात २३०० कोरोना टेस्टिंग लॅब सुरु आहेत. भारतानं योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. अर्थव्यवस्थेपेक्षा लोकांच्या जीवाला प्राधान्य दिलं. कोरोनाचा पहिला रुग्ण मिळण्याआधीच पावलं उचलली आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी मोठा त्याग केला आहे अशी माहिती दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com