
Poison in Cough Syrup 14 Dead and 6 Critical in Madhya Pradesh Tragedy
Esakal
मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं किडनी निकामी झाल्यानं आतापर्यंत १४ मुलांचा मृत्यू झालाय. तर राजस्थानमध्येही चार चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी एका डॉक्टरला अटक करण्यात आलीय. लहान मुलांचा मृत्यू कफ सिरप प्यायल्यानं झाल्याचा आरोप केला जात आहे. या सिरपमध्ये धोकादायक असे केमिकल मिसळले होते असंही सांगण्यात येतंय. ज्या कफ सिरपचं नाव घेतलं जातंय ते कोल्ड्रिफ असं आहे. मध्य प्रदेश, तामिळनाडु आणि केरळ सरकारने या कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घातलीय. हे कफ सिरप श्रीसन फार्मास्युटिकल्सकडून तयार करण्यात येतं.