कोरोनाने अनेकांनी नातेवाईक गमावले, त्यांचा त्रास मला जाणवला

कोरोनाने अनेकांनी नातेवाईक गमावले, त्यांचा त्रास मला जाणवला
Updated on
Summary

मोदींनी देशातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनसुद्धा केलं. सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका असंही मोदी म्हणाले.

नवी दिल्ली - कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना देशासमोर अनेक अडचणी आहेत. लसीकरण (Vaccination) मोहिम सुरु झाली असली तरी लशींचा तुटवडा असल्यानं त्याचा वेग मंदावला आहे. देशातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरण याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की,''कोरोनाशी लढण्यासाठी जे काही अडथळे येत आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारचे सर्व विभाग, देशाचे सुरक्षा दल, संशोधक, वैज्ञानिक दिवसरात्र या आव्हानाचा सामना करण्यासाठी काम करत आहेत.'' पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील (PM Kisan Samman Yojana) आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. (country is dealing with an invisible enemy says pm modi over corona)

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील सर्व शेतकऱ्यांना, गावात राहणाऱ्या सर्व लोकांना कोरोनाबाबत पुन्हा एकदा सावध करत आहे. गावांमध्येही कोरोना वेगाने पोहोचत आहे. केंद्र सरकार याला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनापासून वाचायचं असेल तर त्यासाठी लस हे मोठं माध्यम आहे. केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत असून लसीकरण वेगवान कसं होईल याचा विचार केला जात आहे.

कोरोनाने अनेकांनी नातेवाईक गमावले, त्यांचा त्रास मला जाणवला
''9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटी रुपये जमा केले''

देशात आतापर्यंत जवळपास 18 कोटी लशींचे डोस देण्यात आले आहेत. या संकटात औषधे आणि आवश्यक वस्तुंची साठेबाजी, काळाबाजार होत असल्याचं समोर आलं आहे. मी राज्यांना विनंती करतो की, अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. मानवतेच्या विरोधात हे कृत्य आहे. ऑक्सिजनच्या रेल्वेनं कोरोनाविरोधात लढ्यामध्ये मोठं बळ दिलं आहे. देशातील वेगवेगळ्या भागात खास रेल्वे ऑक्सिजन पोहोचवत असल्याचंही मोदींनी सांगितले.

कोरोनाने अनेकांनी नातेवाईक गमावले, त्यांचा त्रास मला जाणवला
कोरोना एक जीव, त्याला जगू द्या; भाजप नेत्याने तोडले अकलेचे तारे

मोदींनी देशातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनसुद्धा केलं. सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका असंही मोदी म्हणाले. 100 वर्षांनी इतकी मोठी साथ आली आहे आणि जगाची परीक्षा सुरू आहे. आपल्या समोर एक न दिसणारा शत्रू आहे. आपण आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. काही काळ देशासाठी कसोटीचा असून लोकांनी खूप यातना सहन केल्या तेवढाच त्रास मलाही जाणवला असं मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com