''9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटी रुपये जमा केले''

''9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटी रुपये जमा केले''
Updated on

नवी दिल्ली - पंतप्रधान किसान सन्मान (PM KISAN Samman) योजनेतील आठवा हप्ता आज केंद्र सरकारकडून (India Government) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. 19 हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला असून याचा लाभ साडे नऊ कोटी शेतकऱ्यांना (Farmers) होणार आहे. यानिमित्त मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की,''कोरोनाच्या या संकटकाळात शेतकरी कठीण आव्हानाचा सामना करत आहेत. त्यातही त्यांनी मोठं उत्पादन मिळवलं असून सरकारसुद्धा दर वर्षी एमएसपी (MSP) खरेदीचे नविन विक्रम करत आहे. पहिल्यांदा धान्याची खरेदी व्हायची आता गहूसुद्धा खरेदी होत आहे'' असंही मोदी म्हणाले. (PM Kisan Samman yojana pm modi 8th instalment being released)

आज अक्षय तृतीयेचा (Akshay Tritiya) शुभ दिवस आहे. कृषी क्षेत्रासाठी ही नव्या सुरुवातीचा वेळ आहे. याच मुहुर्तावर जवळपास 19 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पाठवण्यात आले आहेत. याचा लाभ पश्चिम बंगालसह (West Bengal) देशातील जवळ जवळ 10 कोटी शेतकऱ्यांना होणार असल्याचं मोदींनी सांगितलं.

यावेळी मोदींनी देशातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनसुद्धा केलं. सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका असंही मोदी म्हणाले. 100 वर्षांनी इतकी मोठी साथ आली आहे आणि जगाची परीक्षा सुरू आहे. आपल्या समोर एक न दिसणारा शत्रू आहे. आपण आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. काही काळ देशासाठी कसोटीचा असून लोकांनी खूप यातना सहन केल्या तेवढाच त्रास मलाही जाणवला असं मोदी म्हणाले.

''9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटी रुपये जमा केले''
कोरोना एक जीव, त्याला जगू द्या; भाजप नेत्याने तोडले अकलेचे तारे

देशातील सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण केलं जात आहे. यासाठी आता तुम्हीही नोंद करा आणि लस अवश्य घ्या. लस आपल्याला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी बळ देईल असं मोदींनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com