बेरोजगारी वाढली! फेब्रुवारीतील दर ८.१ टक्क्यांवर

एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले असताना, दुसरीकडे देशातील बेरोजगारीचा दरही मागील सहा महिन्यांतील उचांकीवर पोहोचला आहे.
unemployment rate
unemployment ratesakal

नवी दिल्ली : एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले असताना, दुसरीकडे देशातील बेरोजगारीचा दरही मागील सहा महिन्यांतील उचांकीवर पोहोचला आहे. फेब्रुवारीत देशातील बेरोजगारी दर ८.१ टक्क्यांवर पोहोचला असून जानेवारीच्या तुलनेत हा बेरोजगारी दर तब्बल दीड टक्क्यांनी वाढला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीद्वारे (सीएमआयई) ही आकडेवारी जाहीर करण्यात आली.

जानेवारीत बेरोजगारी दर १० महिन्यांच्या निच्चांकीसह ६.५७ टक्क्यांवर पोहोचला होता; परंतु आता आलेल्या अहवालानुसार ग्रामीण भागात रोजगार घटल्याने फेब्रुवारीमध्ये देशाचा बेरोजगारी दर गगनाला भिडला आहे. सीएसआयईच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी २०२२ मध्ये ग्रामीण भागात बेरोजगारी २.५१ टक्क्यांनी वाढून ८.३५ टक्क्यांवर पोहोचली आहे; तर या उलट मागील महिन्यात शहरातील बेरोजगारी दर ७.५५ टक्क्यांवर होता. या दराने मागील चार महिन्यांतील निच्चांकी नोंदवली होती.

सीएमआयईनुसार, मागील वर्षी २०२१ च्या मे महिन्यात देशातील बेरोजगारी दर ११.८४ टक्क्यांच्या उचांकीवर पोहोचला होता. नव्या वर्षात जानेवारी २०२२ मध्ये बेरोजगारी दर जवळपास ६.५७ टक्क्यांच्या निच्चांकीवर पोहोचला. मात्र, फेब्रुवारीमध्ये पुन्हा बेरोजगारी वाढली.

सीएमआयई १५ वर्षांहून अधिक वय असलेल्यांचे सर्वेक्षण करते आणि त्याद्वारे रोजगाराच्या परिस्थितीची माहिती एकत्रित केली जाते. यानंतर जे निकाल समोर येतात त्या आधारे बेरोजगारीच्या दरावरील अहवाल तयार केला जातो. जर एखाद्या महिन्यातील बेरोजगारी दर ६.५ टक्क्यांवर असेल तर याचा अर्थ १ हजार लोकांमागे ६५ लोक बेरोजगार राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com