भाजप नेत्याला कौटुंबिक हिंसाचार भोवला; सुनेला १ कोटी भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश

Kanna Laxminarayan Domestic violence
Kanna Laxminarayan Domestic violencegoogle

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष (BJP) यांना घरगुती हिंसाचार (Domestic Violence case) भोवल्याचे दिसतेय. सुनेला एक कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश भाजप नेते कन्ना लक्ष्मीनारायण (Kanna Laxminarayan) यांना स्थानिक न्यायालयाने दिले आहेत. वेळेत नुकसान भरपाई न दिल्यास १२ टक्के व्याज देण्यास न्यायालयानं सांगितलं आहे.

Kanna Laxminarayan Domestic violence
तब्बल 1300 महिलांच्या तक्रारी, लॉकडाऊनच्या काळ्या पडद्याआड घरगुती हिंसाचार

काँग्रेसचे माजी मंत्री आणि सध्या भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते कन्ना लक्ष्मीनारायण यांचा मुलगा कन्ना नागराजू यांनी 10 मे 2006 रोजी कीर्तीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांना २०१३ मध्ये मुलगी झाली. त्यानंतर सासू-सारे आणि पती छळ करत असल्याचा आरोप करत किर्ती यांनी तक्रार दाखल केली. तसेच तिने सासरच्या मंडळींविरोधात न्यायालयात धाव घेतली. नागराजू यांनी दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले होते. तसेच सासू टोमणे मारून छळ करत होती, असे आरोपी किर्ती यांनी याचिकेत केले आहे. किर्ती आणि त्यांच्या मुलीला सासरच्या मंडळींपासून धोका आहे. त्यामुळे संरक्षण देण्यात यावे आणि कौटुंबीक हिंसाचार कायद्यातंर्गत त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच राहण्याचा आणि मुलीच्या उपचाराचा खर्च द्यावा, अशी मागणी किर्ती यांनी याचिकेतून केली होती.

किर्ती यांच्या याचिकेवर आज न्यायालयाने निकाल दिला असून सुनेला एक कोटी रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने भाजप नेते कन्ना लक्ष्मीनारायण, त्यांची पत्नी आणि मुलगा यांना दिले आहेत. तसेच सुन आणि मुलीच्या राहण्याची व्यवस्था आणि मुलीच्या उपचारासाठी दरमहा ५० हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तीन महिन्यात नुकसान भरपाई न दिल्यास त्यांना १२ टक्के व्याज द्यावे लागेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

कन्ना लक्ष्मीनारायण यांनी 1991 ते 1994 आणि 2004 ते 2014 या काळात आंध्र प्रदेशमधील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले होते. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वेगळे झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच गेल्या २०१८ मध्ये ते आंध्र प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com