esakal | स्वदेशी लशीची कमाल; मल्टीपल व्हेरिअंट आणि डबल म्युटेंटवर ठरतेय प्रभावी

बोलून बातमी शोधा

COVAXIN
स्वदेशी लशीची कमाल; मल्टीपल व्हेरिअंट आणि डबल म्युटेंटवर ठरतेय प्रभावी
sakal_logo
By
वृत्तसंस्था

Coronavirus Updates: नवी दिल्ली : दिवसेंदिवस कोरोना व्हायरस उग्र रुप धारण करत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना महामारीने त्रासलेल्या देशभरातील नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी समोर येत आहेत. मल्टीपल व्हेरियंट आणि डबल म्यूटेंट स्ट्रेनवर कोवॅक्सिन प्रभावी ठरताना दिसत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)ने एका अभ्यासाद्वारे हा निष्कर्ष काढला आहे. याबाबत आयसीएमआरने आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

आयसीएमआरने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कोवॅक्सिन SARS-CoV-2 च्या मल्टी व्हेरियंट आणि डबल म्यूटेंट स्ट्रेनवर देखील प्रभावी ठरत आहे. कोवॅक्सिन ही स्वदेशी कोरोना लस आहे. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने ती विकसित केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र तसेच राज्य सरकारने नागरिकांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केलं आहे.

हेही वाचा: लॉकडाउन होणार पण जिल्हाबंदी नाही; आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू होणार आहे. या टप्प्यात १८ किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी भारत बायोटेकने पुढाकार घेतला आहे. पुढील महिन्यात भारत बायोटेक ३ कोटी डोसचे उत्पादन घेणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा: धोनीच्या घरात कोरोनाची एन्ट्री; आई-वडील पॉझिटिव्ह

मार्चमध्ये कंपनीने कोव्हासिनच्या १ कोटी ५० लाख डोसची निर्मिती केली. लस उत्पादक कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, कोवॅक्सिनची वार्षिक उत्पादन क्षमता ७० कोटी डोसपर्यंत वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लस उत्पादक कंपन्यांना लसीचे उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे. तसेच केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना ४ हजार ५०० कोटी रुपयांचा मदतरुपी डोस दिला आहे.

हेही वाचा: रेमडेसिव्हिर स्वस्त होणार; आयात शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

याविषयी बोलताना एल्ला म्हणाले की, कंपनी बंगळूरमध्ये दोन नवीन लसींचे प्रकल्प सुरू करणार आहे. हैदराबादमध्ये कंपनीचे चार प्रकल्प आहेत. मागील महिन्यात आम्ही दीड कोटी डोसचे उत्पादन केले. या महिन्यात आम्ही २ कोटी डोस तयार करीत आहोत. पुढील महिन्यात आम्ही ३ कोटी डोस तयार करू. त्यानंतर सात ते साडेसात दशलक्ष डोस तयार करण्याचा प्रयत्न राहील.