तीन दिवसांच्या उच्चांकानंतर देशात कोरोना रुग्ण घटले!

पीटीआय
Monday, 24 August 2020

Covid19 Updates in India: देशात मागील 24 तासांत 61 हजार 408 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. मागील आठवड्याची आकडेवारी पाहिली तर, कालची वाढ दिलासादायक आहे, कारण याअगोदर प्रतिदिन 70 हजारांच्या आसपास रुग्ण वाढत होते. देशात आतापर्यंत 31.06 लोकांना कोरोना झाला असून दिलासादायक बाब म्हणजे यातील 23 लाख 38 हजार 036 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Covid19 Updates in India : देशात मागील 24 तासांत 61 हजार 408 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. मागील आठवड्याची आकडेवारी पाहिली तर, कालची वाढ दिलासादायक आहे, कारण याअगोदर प्रतिदिन 70 हजारांच्या आसपास रुग्ण वाढत होते. देशात आतापर्यंत 31.06 लोकांना कोरोना झाला असून दिलासादायक बाब म्हणजे यातील 23 लाख 38 हजार 036 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 7 लाख 10 हजार 771 कोरोना रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच गेल्या 24 तासांत 836 जण कोरोनाने दगावले आहेत. शनिवारी भारतातील कोरोना झालेल्यांची संख्या 30 लाखांवर गेली होती. फक्त 16 दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा 20 लाखांवरून 30 लाख झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लसीविषयीचे अप़ेट्स
या वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे आता भारतात 'कम्युनिटी ट्रांन्समिशन' सुरु झाल्याचं चित्र दिसतंय. कारण भारतात सध्या प्रतिदिन 60-70 हजारांच्या वर रुग्ण वाढत आहेत. सध्या सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती कोरोनाच्या लसीची. सध्या भारतात ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि अॅ्स्ट्रॅजेनेका (AstraZeneca) यांनी तयार केलेल्या लसीची  क्लिनिकल चाचण्यांचा दुसरा टप्पा या आठवड्यात सुरू होणार आहे. या चाचण्या पुण्यातील 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मार्फत (Serum Institute of India) घेण्यात येत आहेत. अॅास्ट्रॅजेनेका आणि भारतामध्ये ही लस तयार करुन बाजारात गरिब देशांसाठी उपलब्ध करुन देण्याचा करार आहे.

Congress Crises Live : राहुल गांधींवर नाराजी, गुलाम नबी आझादही राजीनाम्याच्या तयारीत

महाराष्ट्रात काय परिस्थिती?
इकडं महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती पाहिली तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.55 टक्के असून मागील 24 तासांत कोरोनाचे 10 हजार441 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 8,157 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात आतापर्यंत एकूण 4 लाख 88 हजार 271 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 1 लाख 71 हजार 542 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोण म्हणतं काँग्रेस फक्त गांधी घराण्याचा पक्ष? 19 पैकी 14 अध्यक्ष इतर

आतापर्यंत राज्यात 36 लाख 16 हजार 704 कोरोनाच्या टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यापैकी 6 लाख 82 हजार 383 नमुने पॉझिटिव्ह (18.86 टक्के) आले आहेत. राज्यात सध्या 12 लाख 30 हजार 982 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine)आहेत. सध्या 34 हजार 820 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत. राज्यात आज २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 india updates patients number reduced