Coronavirus : भारतात वाढतीये मृतांची संख्या; रुग्णांचा आकडा बाराशे पार!

Coronavirus : भारतात वाढतीये मृतांची संख्या; रुग्णांचा आकडा बाराशे पार!

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरस अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 1,251 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. 

संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर इटलीमध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता.

सध्या भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच यातील मृतांची संख्याही वाढत आहे. सध्या 1,251रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये 32 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात येत आहे.

कोरोनाग्रस्त 102 रुग्ण झाले बरे

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात आहेत. त्यातूनच आत्तापर्यंत १०२ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

केरळमध्ये कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

कोरोनाची लागण झालेल्या केरळमधील ६८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशातील मृतांची संख्या ३२ वर गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com