जगाला दिशा देणार भारत; १५ ऑगस्टपर्यंत येणार कोरोनावर लस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 जुलै 2020

कोरोनाच्या लढ्याला भारत जगाला दिशा देणार असल्याचे जवळपास आता स्पष्ट आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना भारतात बनवलेली कोरोनावरची पहिली लस १५ ऑगस्टला बाजारात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या लढ्याला भारत जगाला दिशा देणार असल्याचे जवळपास आता स्पष्ट आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना भारतात बनवलेली कोरोनावरची पहिली लस १५ ऑगस्टला बाजारात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतात कोरोनावरची पहिली लस तयार करण्यात आली असून, जुलैमध्ये तिची क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेकजण कोरोनावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशात भारत बायोटेकने तयार केलेली लसची मानवी चाचणी ७ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. भारत बायोटेकनं करोनावरील COVAXIN लस तयार केल्याची सोमवारी घोषणा केली होती. या लसीवर सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली कोरोना लस तयार केल्याचे भारत बायोटेकच्या व्यवस्थापकीय संचलकांनी सांगितले होते. त्यानंतर भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं फेज १ आणि फेज २ मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली होती.
----------------
जिओमध्ये आणखी एक मोठी गुंतवणूक; आता कोणी केली गुंतवणूक?
----------------
चांगली बातमी : भारतात कोरोनावरील दुसरी लसही विकसित
----------------
दरम्यान, आठवडाभरात कोरोनावरील दुसरी लसही भारतात विकसित झाली आहे. कोरोनाची ही दुसरी लस अहमदाबादची कंपनी झायडस कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडने तयार केली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या लसीच्या फेज १ आणि फेज २ च्या मानवी चाचणीसाठी मान्यता दिली आहे. दरम्यान, ही मानवी चाचणी पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. या लसीची प्राण्यांवर यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली आहे. याच आधारावर त्यांना पुढील फेजसाठी चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कंपनी लवकरच मानवी चाचणीसाठी एनरॉलमेंट प्रक्रिया सुरू करणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी कंपनीला तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचंही म्हटलं जात आहे. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारनंदेखील उशीर न करता त्वरित याच्या पुढील चाचणीला परवानगी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID-19 vaccine by Aug 15 likely ICMR Bharat Biotech join hands

टॅग्स
टॉपिकस