esakal | भारतात ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनकाच्या व्हॅक्सिनला पुढच्या आठवड्यात मिळू शकते मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

 जगभरात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यातच कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकारने खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत आता सर्वांचे लक्ष कोरोना व्हॅक्सिन कधी येणार याकडे लागून राहिलं आहे.

भारतात ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनकाच्या व्हॅक्सिनला पुढच्या आठवड्यात मिळू शकते मंजुरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यातच कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकारने खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत आता सर्वांचे लक्ष कोरोना व्हॅक्सिन कधी येणार याकडे लागून राहिलं आहे. जगात अनेक देशांमध्ये कोरोना व्हॅक्सिनची ट्रायल सुरु आहे. यातच भारतासाठी मोठी बातमी आली आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत ऑक्सफर्ड - एस्ट्राझेनकाच्या व्हॅक्सिनला मंजुरी मिळू शकते. 

रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेत लसीकरण सुरु झालं आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातही व्हॅक्सिनच्या मंजुरीला वेग येणार आहे. एस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या व्हॅक्सिनला मोदी सरकार पुढच्या आठवड्यात मंजुरी देऊ शकते. मॅन्युफॅक्चररकडून आकडेवारी मिळाल्यानंतर सरकार याला मंजुरी देण्याची शक्यता आहे. ही मंजुरी फक्त आपत्कालीन परिस्थिती वापरासाठी असेल. 

हे वाचा - कोरोनाची भीती नसलेला देश; कशाच्या जोरावर आहे बिनधास्त?

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असून पुढच्या महिन्यात भारतात लस टोचण्यास सुरु करण्याचा प्रयत्न आहे. फायजर आणि बायोएनटेकच्या व्हॅक्सिनचा वापर केला जाऊ शकतो. भारताने आधीच एस्ट्राझेनकाचे पाच कोटींपेक्षा जास्त डोस तयार केले आहेत. याचा वापर लसीकरणात होऊ शकतो. 

ऑक्सफर्डच्या व्हॅक्सिनला मंजुरी मिळण्याआधी फायजर व्हॅक्सिनची पहिली खेप भारतात पोहोचेल. 28 डिसेंबरला व्हॅक्सिनचं पहिलं कन्साइनमेंट येत आहे. यासाठी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवर खास तयारी करण्यात आली आहे. तसंच दिल्लीतील राजीव गांधी रुग्णालयातही व्हॅक्सिन स्टोअर करण्यासाठी डीप फ्रीजर ठेवण्यात आले आहेत. 

हे वाचा - भारताचे लसीकरण जगात सर्वांत मोठे; ‘फिच’ने केले देशाचे कौतुक

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी आधीच सांगितलं आहे की, जानेवारीमध्ये देशात लसीकरण मोहीम सुरू होईल. आशा आहे की फायजर आणि ऑक्सफर्डच्या व्हॅक्सिनचा वापर यामध्ये केला जाऊ शकतो. जवळपास 30 कोटी लोकांचा लसीकरणामध्ये समावेश असेल. यात आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे, सैन्य, पोलिस आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय 50 वर्षांच्या वरील व्यक्तींनासुद्धा व्हॅक्सिन देण्यात येईल. 

loading image
go to top