esakal | 'तर प्रत्येक जिल्ह्याचं काँग्रेस भवन होणार कोविड सेंटर!'

बोलून बातमी शोधा

Covid_Center

केंद्र सरकारने छत्तीसगड सरकारला दिलेल्या ६९ व्हेंटिलेटरपैकी ५८ व्हेंटिलेटर हे निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती पुढे आली आहे.

'तर प्रत्येक जिल्ह्याचं काँग्रेस भवन होणार कोविड सेंटर!'
sakal_logo
By
वृत्तसंस्था

रायपूर : छत्तीसगडमध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला लक्षात घेता मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मोठी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सर्व मंत्री, आमदार आणि महापौर त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार आहेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल, प्रभारी पीएल पुनिया, पीसीसी अध्यक्ष मोहन मरकाम आणि इतर कॅबिनेट मंत्री या बैठकीला उपस्थित होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. तसेच गरज पडल्यास सर्व जिल्हा काँग्रेस कमेटीच्या कार्यालयाचा वापर कोविड सेंटर म्हणून करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व काँग्रेस भवनमध्ये कोविड सेंटर उभारण्यास सर्वांनी शिक्कामोर्तब केले. 

‘कुरआन’बाबतची याचिका कोर्टाने फेटाळली; सय्यद रिझवींना ठोठावला दंड

केंद्र सरकारने छत्तीसगड सरकारला दिलेल्या ६९ व्हेंटिलेटरपैकी ५८ व्हेंटिलेटर हे निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती पुढे आली आहे. व्हेंटिलेटर तयार करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, त्यामुळे बैठकीला उपस्थित सर्वांनी नाराजी दर्शवली. 

गेल्यावर्षीपेक्षा यंदा कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये कंट्रोल रुम उभारण्यात येणार आहेत. डीसीसीची पाच सदस्यीय कमिटी तयार करण्यात येत आहे. सत्ताधारी पक्षातील सर्व नेते आणि जिल्ह्यांचे समन्वयक याचे कामकाज पाहणार आहेत. मंत्री, आमदार आणि महापौरांसह अन्य लोकप्रतिनिधी, महामंडळाचे सदस्य मुख्यमंत्री मदत निधीसाठी एक महिन्याचा पगार देणार आहेत. 

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट; रुग्णसंख्या दीड लाखाच्या वरच​

शहरांसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. त्यादृष्टीने अनेक सूचना करण्यात आल्या. ऑक्सिजन बेड सुविधा पुरवण्यावर सर्वांनी सहमती दर्शवली. जिल्हा काँग्रेस कमिटीकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. 

कोरोना चाचणी आणि लसीकरणावर भर द्यावा. रेमडेसिव्हीरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दोन आयएएस अधिकाऱ्यांकडे विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.  असे आवाहन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलं आहे. 

Video: गुजरात मॉडेलच्या चिंधड्या; हॉस्पिटलबाहेर अ‍ॅम्ब्युलन्सची भली मोठी रांग!​

दरम्यान, काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी ऑनलाइन बैठक सोमवारी घेतली होती. यावेळी सोनिया आणि राहुल गांधी यांनी राज्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. देशातील विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या प्रचारसभा, त्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी, धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत, त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या परिस्थितीला काही प्रमाणात आपण सर्वच जबाबदार आहोत. त्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे आणि आपल्या स्वार्थापेक्षा देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, अशी भावना सोनिया गांधी यांनी व्यक्त केली.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)