

RBI digital payment New Rules 2026
esakal
Banking rule changes May 1 India : महिन्याच्या सुरूवातीला केंद्र सरकारकडून काही बदल करण्यात आले आहेत. १ मेपासून नव्या महिन्याची सुरुवात होताच सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल झाले आहेत. डिजिटल व्यवहार, एटीएम शुल्क, क्रेडिट कार्ड, गॅस सिलिंडर डिलिव्हरी अशा विविध क्षेत्रांतील या बदलांचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होणार आहे. लग्नसराईच्या हंगामात या दरवाढीचा मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषत: महागाईच्या पार्श्वभूमीवर हे बदल अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. नागरिकांसाठी ५ मोठे बदल लागू होत आहेत.