crime latest news desh
crime latest news desh esakal

Crime Case : हव्यास वंशाच्या दिव्याचा, लेकींसमोर बापानं आईला जिवंत पेटवलं; जन्मठेपेची शिक्षा

आईला न्याय मिळवून देण्यासाठी दोन्ही मुलींनी कायदेशीर लढा दिला आणि त्या वडिलांविरोधात न्यायालयात गेल्या.

वंशाला दिवा न दिल्यानं वडिलांनी मुलींसमोर आईला जिवंत जाळल होतं. सहा वर्षांपू्र्वी घडलेल्या या घटनेतील आरोपी नराधम बापाला न्यायालयानं अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तान्या आणि लतिका यांच्या आईला संपवलं मुलगा होत नाही म्हणून बापानं जिवंत जाळलं होतं. जून २०१६ मध्ये ही घटना घडली होती. या दोघींनीही आपल्या आईला जिवंत जळताना पाहिलं होतं. आईला न्याय मिळवून देण्यासाठी दोन्ही मुलींनी कायदेशीर लढा दिला आणि त्या वडिलांविरोधात न्यायालयात गेल्या. अखेर न्यायालयानं त्यांच्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. (Crime News)

घडलेली घटना अशी की, ४८ वर्षांच्या मनोज बन्सल यांनी ६ वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीला जिवंत जाळलं होतं. त्यावेळी त्यांनी तान्या आणि लतिकाला एका खोलीत कोंडलं होतं. मात्र दोघींनी एका खिडकीतून संपूर्ण प्रकार पाहिला होता. त्यावेळी लतिका १४ तर तान्या १२ वर्षांची होती. न्यायालयानं दिलेला निकाल महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया मुलींचे वकील असलेल्या संजय शर्मांनी दिली आहे. दरम्यान, आपल्या पत्नीला जिवंत जाळणाऱ्या या पतीला बुलंदशहर न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

crime latest news desh
Ramdas Athawale : शिंदे गटानं आरपीआयमध्ये विलीन व्हावं; रामदास आठवलेंची मोठी ऑफर

दरम्यान, या प्रकरणात आणखी सात आरोपी असून सगळे एकाच कुटुंबातील आहेत. त्यांच्या विरोधातला खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर ऑगस्टमध्ये सुनावणी होईल, अशी माहिती शर्मांनी दिली आहे. बेरोजगार असलेले वडील अतिशय क्रूरपणे वागायचे. त्यांचं क्रौर्य आम्ही कित्येकदा पाहिलं, अशा शब्दांत दोन बहिणींनी त्यांच्या कटू आठवणी सांगितल्या आहेत.

वंशाचा दिव्यासाठी घेतला पत्नीचा जीव

मनोज बन्सल यांचा विवाह २००० साली अनू यांच्याशी झाला. त्यांना दोन मुली झाल्या. मात्र मनोज यांना वंशाचा दिवा होता. त्यासाठी त्यांनी पाचवेळा अनू यांना गर्भपात करायला लावला. १४ जून २०२६ रोजी मनोज यांनी अनू यांना केरोसिन टाकून पेटवलं. ही घटना तान्या आणि लतिका यांनी पाहिली. लतिकानं मदतीसाठी तिच्या आजीला (आईच्या आईला) बोलावलं. अनू यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना दिल्लीला हलवण्यात आलं. मात्र २० जूनला त्यांचं निधन झालं होतं.

crime latest news desh
आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com