Crime News : गुंडाचा माज उतरणार! ६ गुंडांची २० कोटी २६ लाखांची मालमत्ता होणार जप्त

Crime News
Crime News

देशात गुंडाचा माफियाराज वाढत चालले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा अशी चर्चा असते. दरम्यान उत्तर प्रदेशात गुंडाराज संपवण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत. पोलीस गुन्हेगारांच्या मागे लागले आहेत. या कारवाईच्या भाग म्हणून जमीन हडप करणे, अंमली पदार्थांची तस्करी आणि गुरांची तस्करी यात सहभागी असलेल्या सहा गुंडांची सुमारे २० कोटी २६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. या आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश नगर कोतवाली, रामनगर, मसौली आणि जैदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस आणि तहसील प्रशासनाला देण्यात आले आहेत. योगी सरकारचा हा मोठा निर्णय मानल्या जात आहे.

हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

टोळीचा म्होरक्या संजय सिंग सिंगला याच्या गावातील भारवारा तहसील सदर लखनऊ येथील सुमारे ५० लाख रुपयांचा भूखंड जप्त करण्यात येणार आहे.तसेच

जैदपूर ठाणे येथील तेरा गावातील मकसूदवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची ४ कोटी ७१ लाख ७१ हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.

Crime News
पवार साहेबांनी सुद्धा...पुणे लोकसभा पोटनिवडणूकीवर जयंत पाटलांनी सोडलं मौन

हजरतपूर गावातील सय्यद मोहम्मद मेहंदी उर्फ ​​झुल्फी मियाँ याच्याविरुद्ध मारहाण, धमकावणे, कार्यालयीन कामात अडथळा आणणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.त्याची ९ कोटी १२ लाख ४८ हजार रुपये किमतीची ५० दुकाने जप्त करण्यात येणार आहेत. (Crime News)

एका टोळीच्या म्होरक्या सगीर अहमद आणि टोळीचा सदस्य शकील अहमद यांची ४ कोटी ७७ लाख १३ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नगर कोतवालीच्या फतेहाबाद बडेल येथील रहिवासी शरदकुमार वर्मा याच्यावर जमीन खरेदी-विक्रीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची १ कोटी ४१ लाख ६० हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.

Crime News
Maharashtra Politics : सावरकरांचा विरोध करुन भागत नाही, पवारांना कळलं काँग्रेसला कधी उमगणार...?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com