Crime News: टॅटूमुळे आरोपी गजाआड! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन व्हायरल केला होता व्हिडीओ

दोन वर्षांआधी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. आरोपींना हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
Crime News: टॅटूमुळे आरोपी गजाआड! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन व्हायरल केला होता व्हिडीओ
Updated on

Crime News: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात दोन वर्षांआधी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. आरोपींना हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमुळे या आरोपींची ओळख पटली आहे. यामधील चार लोकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बुधवारी (दि. १८ ऑक्टोबर) न्यायालयाने अल्पवयीन मुलीला न्याय देत चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यातील वकील विभास चटर्जी यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, व्हिडीओमुळे या आरोपींविरुद्ध पुरावे सादर करण्यात मदत झाली आणि न्यायालयाला निर्णय घेता आला.

मुर्शिदाबाद जिल्ह्यातील लालबाग सब-डिवीजनल कोर्टाचे न्यायाधीश दीप्ता घोष यांनी या प्रकरणातील आरोपी बासुदेब मंडल, मिथुन दास, आकाश मंडल आणि अरुण मंडल यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या चौघांवर POCSO, भारतीय दंड संहिता आणि आयटी अधिनियमाच्या अनेक कलमांखाली दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा खटला १२० दिवसांपर्यंत चालला, ज्यानंतर अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला.

टॅटूमुळे आरोपींना झाली शिक्षा

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत वकील विभास चटर्जी म्हणाले की, "या बलात्काराचा व्हिडीओ पुणे,आसाम, कोलकातामधील असलेल्या फोरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.(Latest Marathi News)

Crime News: टॅटूमुळे आरोपी गजाआड! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन व्हायरल केला होता व्हिडीओ
Rahul Narvekar: हॉस्पिटल आहे की मस्करी?; 'सेंट जॉर्जेस'मध्ये कुत्रे झोपलेले पाहून नार्वेकरांनी अधिकाऱ्यांना झापलं

या व्हिडीओची तपासणी केल्यावर आढळलं की दोन बलात्काऱ्यांच्या हातावर टॅटू आहेत. व्हिडीओमधील संशयीतांची तपासणी केली असता, त्यांच्या शरीरावरील टॅटू आणि व्हिडीओमधील टॅटू सारखेच होते. या व्हिडीओमधील आवाजांचे देखील नमुने सादर करण्यात आले होते." सरकारी वकील म्हणाले की इलेक्ट्रॉनिक पुरावे या प्रकरणात महत्वाचे सिद्ध झाले. ज्यामुळे न्यायालय निर्णय़ घेऊ शकलं. (Latest Marathi News)

Crime News: टॅटूमुळे आरोपी गजाआड! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन व्हायरल केला होता व्हिडीओ
Rahul Gandhi : सोनिया गांधींना 'नूरी' नावाचे श्वान भेट देणं राहुल गांधींना पडलं महागात; जाणून घ्या नेमकं प्रकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com