Viral: भूक लागली मगर घरात घुसली! वनविभागाची बोबडीच वळली

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या मगरीच्या व्हिडिओनं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Viral
Viralesakal

Crocodile enter home: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या मगरीच्या व्हिडिओनं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. घरात साप, बिबट्या, हत्ती आल्याच्या बातम्या यापूर्वी आपण ऐकल्या आहेत. मात्र आता सध्या सोशल मीडियावर एका बातमीनं नेटकऱ्यांना अवाक केले आहे. ते म्हणजे त्या घरात चक्क मगरच घुसल्यानं परिसरातील नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ हा उत्तर प्रदेशातील इटावा मधला आहे. व्हिडिओमध्ये घरात मगर घरात आल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी वन विभागानं तातडीनं बोलावून घेतले होते. मात्र त्यांनाही मगर पाहून काय करावे हे कळेनासे झाले होते. मगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घरातून मगरीला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले होते. बराचवेळानंतर त्या मगरीला बंदिस्त करण्यात त्यांना यश आले.

इटावातील त्या घरात आठ फूट लांबीची मगर आढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मगरीनं नागरिकांच्या मनात दहशत निर्माण केली होती. घरात मगर आल्याचे कळताच नागरिकांनी घराचे दरवाजे बंद केले होते. त्यानंतर त्यांनी यासंबंधी पोलिसांना माहिती दिली होती. दुसऱ्या दिवशी वनविभागाचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी मगरीला बंदिस्त केले. दोन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या त्या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली होती.

Viral
Monkey Viral Video : चिप्स दिले नाही म्हणून माकडाने उपटल्या झिंज्या! व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

इटावामधील जैतीया गावामध्ये असणाऱ्या हरनाम सिंग यांच्या घरात मगर शिरली. वनविभानं त्या मगरीचे वय दोन वर्षे असल्याचे सांगितले असून हरिनाम यांनी रात्रीच्या अकरा वाजता वनविभागाला घरात मगर आल्याचे सांगितले होते. त्यानंतर वन्यजीव तज्ञ डॉ.आशिष त्रिपाठी यांनी मगरीला बंदिस्त करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. प्रभागीय अधिकारी अतुल शुक्ला यांनी त्या मगरीला चंबळच्या अभयारण्यात सोडण्याचे आदेश दिले आहेत.

Viral
Viral Video: भात मागण्यासाठी चीनी लोक वापरताहेत मिथूनचं गाणं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com