‘सीआरपीएफमुळे दहशतवादी कारवायांत घट’

केंद्रीय राखीव पोलिस दल हे एक स्वयंपूर्ण दल आहे
CRPF Recruitment
CRPF Recruitmentesakal

नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलिस दल हे एक स्वयंपूर्ण दल आहे. आता तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या बंदुका आहेत. या दलाच्या प्रयत्नांमुळे दहशतवादी कारवायांना आळा बसला आहे. त्यामुळेच अनेक राज्यांकडून ‘सीआरपीएफ’च्या सुरक्षा तैनातीसाठी सर्वाधिक मागणी येते. कारण या दलाकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात कौशल्य आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांनी काढले.

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ५७ व्या सीआरपीएफ शौर्य दिनानिमित्त निमलष्करी दलाच्या जवानांना पदके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी आणि हुतात्मा जवानांच्या नातेवाइकांचा सन्मान करून 'शौर्य दिवस' साजरा केला. त्यावेळी भल्ला बोलत होते. या दलाच्या सक्रीय पहाऱ्यामुळे काश्‍मीरचे पर्यटन पुन्हा सुरू झाल्याचे श्रेयही भल्ला यांनी त्यांना दिले. पुलवामा हल्ल्यादरम्यान सहायक पोलिस निरीक्षण मोहनलाल यांना शौर्यासाठी राष्ट्रपती पोलिस पदक (मरणोत्तर) प्रदान करण्यात आले.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे महासंचालक अतुल करवाल हे काश्‍मीरमध्ये तत्कालीन सीआरपीएफचे पोलिस महानिरीक्षक होते. त्यांना २०१६ मध्ये काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी यशस्वी कारवाईसाठी शौर्य पदक प्रदान करण्यात आले. पोलिस महानिरीक्षक रवी दीप साही यांनाही २०१७ मध्ये कारवाईसाठी शौर्य पोलीस पदकही देण्यात आले. भल्ला यांनी, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी सीआरपीएफ दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे पर्यटक खोऱ्यात परत येऊ लागले आहेत, असे कौतुकही त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com