
क्रिप्टोकरन्सी आर्थिक स्थिरतेसाठी धोकादायक : शक्तिकांत दास
नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे (RBI Governor Shaktikanta Das) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले असून, काही दिवसांपूर्वी याबाबत घेण्यात आलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दास यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पादरम्यान (Budget 2022) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीद्वारे होणाऱ्या कमाईवर कर आकारणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज दास यांनी वरील विधान केले आहे. (Cryptocurrency Threat For Financial Stability)
हेही वाचा: कारमधील सर्व सीटसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट अनिवार्य : गडकरी
दास म्हणाले की, क्रिप्टोमधील गुंतवणूकबाबत गुंतवणुकीचा निर्णय स्वत:च घ्यावा असे पहिलेच आम्ही स्पष्ट केले असून, करत असलेली गुंतवणूक स्वतःचीच जबाबदारी असल्याचेही गुंतवणूकदारांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून कोणत्याही नियम तयार करण्यात आला नाही, असेही दास यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा: क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताय? वाचा अर्थसंकल्पातील महत्त्वाची घोषणा
रिझर्व बँकेचे पतधोरण जाहीर; व्याजदरात कोणताही बदल नाही
रिझर्व बँकेने (RBI) आज पतधोरण जाहीर केले. व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरबीआयने व्याजदर जैसे थे म्हणजेच 4 टक्के इतकाच कायम ठेवला आहे. एमएसएफ रेट आणि बँक रेट कोणताही बदल न करता 4.25% तर रिवर्स रेपो रेट 3.35 इतका ठेवण्यात आला आहे, याविषयी भारतीय रिजर्व बँकचे गवर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी माहिती दिली तर वर्ष 2022-23मध्ये जीडीपी 7.8 टक्के राहण्याचा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा: गौरवास्पद! इस्रोने 1975 पासून अंतराळात सोडले 129 उपग्रह
याआधी डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले होते. त्यावेळी व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. या वेळी व्याज दरात बदल केला जाणार, असे बोलले जात होते. मात्र रेपो रेट 4 टक्क्यांवरच कायम ठेवण्यात आलाय. महागाई आणि वाढत्या कच्च तेलाच्या किंमती पाहता, आरबीआयकडून रिर्व्हस रेपो दर बदलायला पाहीजे होता मात्र यात कोणताही बदल न केल्याने सामान्यांवर याचा मोठा फटका बसणार आहे.
Web Title: Cryptocurrency Big Threat For Financial Stability Shaktikanta Das
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..