esakal | पंतजली-डाबरसह अनेक कंपन्यांच्या मधात भेसळीचा गोडवा; CSE ने केला दावा
sakal

बोलून बातमी शोधा

honey.

मधाच्या शुद्धतेबाबतच्या 22 मापदंडांपैकी बऱ्याच कंपन्या या केवळ 5 मापदंडाबाबतीतच खऱ्या उतरल्याची माहिती CSE कडून देण्यात आली आहे. 

पंतजली-डाबरसह अनेक कंपन्यांच्या मधात भेसळीचा गोडवा; CSE ने केला दावा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : मधाच्या नावाखाली अनेक मोठ्या कंपन्या साखरेच्या पाकाची भेसळ करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर सायन्स एँड एनवायरनमेंट (CSE) ने केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आलीय. मध तयार करणाऱ्या सर्वाधिक कंपन्या या मधामध्ये साखरेच्या पाकाची भेसळ करत असल्याची बाब उघड झालीय. यासाठी CSE ने 13 कंपन्यांच्या मधाच्या नमुन्यांचं परिक्षण केलंय. आणि या परिक्षणातून आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. तब्बल 77 टक्क्यापर्यंत या मधांमध्ये भेसळीचे प्रमाण आढळून आलं आहे. मधाच्या शुद्धतेबाबतच्या 22 मापदंडांपैकी बऱ्याच कंपन्या या केवळ 5 मापदंडाबाबतीतच खऱ्या उतरल्याची माहिती CSE कडून देण्यात आली आहे. 

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी द ग्रेट खली मैदानात; म्हणाला सरकारची गाठ आमच्याशी आहे

CSE च्या या अभ्यासात पतंजली, बैद्यनाथ, झंडू, डाबर, हितकारी आणि एपिस हिमालयासारख्या कंपन्या समाविष्ट होत्या. मात्र, डाबर आणि पतंजलीने या चाचण्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही यांनी म्हटलंय. नैसर्गिकरित्या मिळणारा मधच गोळा करुन त्याची विक्री आमच्यामार्फत केली जात असल्याचा या कंपन्यांचा दावा आहे. 

आमच्या कंपनीचा मध 100 टक्के शुद्ध आहे. त्यात कसलीही भेसळ नाहीये. फूड सेफ्टी एँड स्टँडर्ड ऑथोरिटीच्या  (FSSAI) सर्व नियमांचं पालन योग्यरित्या केलं गेल्याचा दावा या कंपन्यांनी केलाय. जर्मनीमध्ये झालेल्या एमएमआर चाचणीत आमचा मध यशस्वी ठरला होता. तपासणीचे सगळे 22 निकष आम्ही पूर्ण करतो. CSE चा जो अहवाल आहे तो प्रायोजित असल्याचं वाटतंय असं डाबरच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा - योगींजींच्या हालचालींमागे महाराष्ट्र द्वेषाची किनार ?

याबाबत पतंजलीच्या आचार्य बालकृष्ण यांनीही प्रतिक्रिया दिलीय त्यांनीही या दाव्याचं खंडन केलंय. त्यांनी म्हटलंय की, आम्ही 100 टक्के शुद्ध आणि नैसर्गिक मधाची निर्मिती करतो. प्रक्रिया केलेल्या मधाला अधिक प्रमोट केलं जावं म्हणून नैसर्गिकरित्या मधाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना बदनाम करण्याचा हा कट असल्याचं त्यांनी म्हटलंय. 
याआधी FSII ने देशात आयात केला जाणारा मध गोल्डन सिरप, राईस सिरप आणि इनव्हर्ट शुगर सिरपची भेसळ करुन तयार केला जात असल्याचं राज्याच्या खाद्य आयुक्तांना सांगितलं होतं. 2003 आणि 2006 मध्ये सॉफ्ट ड्रिंकच्या केलेल्या तपासणीनंतर त्यात जी भेसळ आढळून आली होती त्याहीपेक्षा भयंकर भेसळ ही मधात केली जात आहे. ही भेसळ आपल्या शरीराला अपायकारकही आहे. ज्या 13 मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले गेले त्यापैकी 10 NMR चाचणीत अयोग्य ठरले, अशी माहिती सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी दिली आहे. 

loading image
go to top