बँकेनं पैसे कापले म्हणून अंथरुण-पांघरुन घेऊन कस्टमर शाखेतच बसला आंदोलनाला

bank 1.jpg
bank 1.jpg

अहमदाबाद- बँकेतील कामकाज संथगतीने होत असल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. परंतु, गुजरातमधील राजकोट येथील एका बँकेने एका ग्राहकाच्या अकाऊंटमधून पैसे कापले. त्यानंतर चिडलेला ग्राहक थेट गादी आणि उशी घेऊन बँकेच्या शाखेत धरणे आंदोलनास बसला. बँकेने खात्यातून तब्बल 1.62 लाख रुपये कापले होते. ग्राहकाच्या मते, तो गेल्या 10 दिवसांपासून अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडत होता. परंतु, त्याचं कोणीच ऐकले नाही. त्यानंतर वैतागून त्याने असे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 24 तासांत त्याचे कापले गेलेले पैसे पुन्हा जमा झाले. परंतु, हा ग्राहक आता माफीनाम्यावर अडून बसला आहे. 

हे प्रकरण राजकोट जिल्हा पंचायत चौकातील एका बँकेच्या शाखेतील आहे. बँकेच्या नजीक राहणारे विकासभाई दोशी यांचे चालू खाते याच शाखेत आहे. बँकेने विशालभाईंच्या संस्थेला सीएस अहवाल मागितला होता. बँकेने संबंधित कागदपत्रे मागितली होती, ती मी नवीन फॉरमॅटमध्ये जमाही केले होते. त्यानंतरही माझ्या खात्यातून 1.62 लाख रुपये कापले. यासाठी मागील 10 दिवसांपासून बँकेत माझी बाजू मांडत होतो. पण कोणीच मला उत्तर दिले नाही. त्यामुळे वैतागून मी हे पाऊल उचलले आहे. बँकेतच धरणे करण्यास बसल्यानंतर राजकोट शाखेत खळबळ उडाली. विकासभाई दोशी हे सहा तास शाखेत बसले होते. एक दिवसानंतर बँकेने खात्यात पुन्हा 1.39 लाख रुपये जमा केले. परंतु, शूल्काच्या नावाखाली कापलेल्या रकमेवर जीएसटीची रक्कम कापली होती. ती अद्याप परत दिली गेलेली नाही. 

याबाबत येस बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर ऋषभ वसा म्हणाले की, कस्टमरला सीएस सर्टिफिकेट मागण्यात आले होते. त्यांनी ते 30 डिसेंबर रोजी जमा केले. 31 डिसेंबरला त्यांना शूल्क लावण्यात आले. त्यांनी जी कागदपत्रे दिली होती. ती ऍप्रू्व्हल देण्यास उशीर झाला होता. यासाठी कस्टमरने माफीही मागितली होती. याबाबत आम्ही मुंबई ऑफिसला कळवलेही आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com