'चिंतन शिबीर' ही परंपरा होऊ देऊ नका; सोनिया गांधींनी काँग्रेसजनांचे टोचले कान

डिजिटल मेंबरशिपवर काँग्रेसनं लक्ष्य केलं केंद्रीत, २.६ कोटी नवे सदस्य जोडल्याची माहिती
Sonia Gandhi
Sonia Gandhi
Updated on

नवी दिल्ली : राजस्थानमधील उदयपूर इथं काँग्रेसचं तीन दिवसीय चिंतन शिबीर पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चेसाठी तसेच ब्रेन स्टॉर्मिंगसाठी आज (सोमवार) काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सोनिया गांधी यांनी काँग्रेसजनांचे चांगलेच कान टोचले. चिंतन शिबीर ही परंपरा होता कामा नये, असं त्यांनी म्हटलं आहे. (CWC meets Sonia says chintan shivir should not become a ritual)

Sonia Gandhi
नवनीत राणांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; म्हणाल्या...

सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळी त्यांनी CWCला (राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणी समिती) हे लक्षात आणून दिलं की, आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर आत्मपरीक्षण करणं हे गरजेचं आहेच. पण हे अशा पद्धतीनं होऊ नये की, ज्यामुळं आत्मविश्वास आणि मनोबल खचेल आणि निराशा, विनाशाचे वातावरण तयार होईल. दरम्यान, सोनिया म्हणाल्या, उदयपूरमधून पक्षाच्या नवसंजीवनीसाठी एकता, दृढनिश्चय आणि वचनबद्धतेचा संदेश दिसला पाहिजे.

Sonia Gandhi
"800 हिंदू कुटुंबं पाकमध्ये परत गेली, केंद्रासाठी शरमेची बाब"

सहा गटांपैकी प्रत्येकासाठी विस्तृत अजेंडा सेट करण्यासाठी समन्वय पॅनेल तयार करण्यात आलं होतं. CWC ने डिजिटल सदस्यत्वाबाबत पक्षाच्या घटनेत सुधारणा करण्याबाबत निर्णय घेणंही अपेक्षित आहे. काँग्रेसने गेल्या महिन्यात संपलेल्या डिजिटल मेंबरशिप ड्राईव्हमध्ये २.६ कोटी नवीन सदस्य जोडले आहेत, असंही यावेळी सोनिया गांधी यांनी बैठकीत सांगितलं.

13 मे पासून काँग्रेसच्या चिंतन शिबिराला सुरुवात

दरम्यान, उदयपूरमध्ये १३ मे पासून सुरु होणाऱ्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराला देशभरातील सुमारे ४०० काँग्रेस नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये राजकारण, आर्थकारण, सामाजिक न्याय, शेतकरी, तरुण आणि संघटनात्मक वाद अशा सहा विविध प्रकारच्या थीमवर चर्चा होईल. या शिबीरात येणआऱ्या बहुतेक लोकांनी यापूर्वी संघटनेत आणि केंद्र सरकारमध्ये एक किंवा अनेक पदं भूषवली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com