

IMD Alert
esakal
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अकवान’ चक्रीवादळ वेगाने शक्तिशाली होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. हे चक्रीवादळ २० नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १२० ते १३० किलोमीटरपर्यंत, तर वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी १४५ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येतेय.