
लेह ते मनाली...तब्बल 55 तास सायकलिंग ! पुण्याच्या प्रितीची गिनीज बुकात नोंद
पुण्यातील प्रीती मस्के हिने शुक्रवारी 55 तास 13 मिनीटांत लेह ते मनालीचा मार्ग सायकलने गाठलाय.(Cycling)प्रिती ही दोन मुलांची आई आहे.अत्यंत कठीन असलेलं हे टास्क पूर्ण करत प्रीतीने तिचे नाव गिनीज बुकमधे नोंदवले आहे.तज्ञांच्या माहितीनुसार 430 किमी चा मार्ग आणि त्यात 8000 मीटर उंची पार करणं सोपं नसतं.मात्र प्रीतीने ते करून दाखवले आहे.
हे आव्हान पूर्ण करण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने प्रीतीला 60 तासांची विंडो दिली होती.तिच्या या प्रवासाला लेह येथून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने हिरवा झेंडा दाखवला.सकाळी 6 वाजता लेह येथील मुख्य अभियंता ब्रिगेडियर गौरव कार्की यांच्या हस्ते हा हिरवा झेंडा दाखवण्यात आला.मनाली येथे काल दुपारी एक वाजता पोहोचत बीआरओचे कमांडर कर्नल शबरीश वाचली यांच्या उपस्थितीत तिने हा प्रवास पूर्ण केला.
न झोपता केली तिने सायकलिंग
या अतिउंचीवरील सायकलिंग मोहिमेत प्रीतीला न झोपता प्रवास करायचा होता.त्यामुळे झोपेचे नियोजन हे तिच्यासमोरील मोठे आव्हान होते.हाय पासवर तिचा श्वास कोंडल्याने तिने मार्गात दोनदा ऑक्सिजन घेतले.प्रीतीचे क्रू मेंबर म्हणाले, "जी बीआरओच्या पाठिंब्याशिवाय ही आव्हानात्मक मोहिम शक्यच नव्हती.बीआरओने दोन वाहनांसह सॅटेलाईट फोन,वैद्यकीय सहायकही तैनात केले होते."
प्रवासाच्या दहा दिवसाआधी दिली होती लेहला भेट
प्रवासाआधी लेहला भेट देण्याचं कारण म्हणजे प्रितीला लेहचे हवामान उमगते की नाही हे बघायचं होतं.प्रीतीचे वय ऐकून लोकांना तिच्या या पराक्रमाचं आश्चर्य वाटतं.वयाच्या 40 व्या वर्षी प्रीतीने सायकलिंगला सुरूवात केली होती.वय ही फक्त एक संख्या आहे असा प्रीतीचा विश्वास आहे.तिच्या मते,"स्वत:वर आत्मविश्वास असेल तर कुठलीच गोष्ट आपल्याला रोखू शकत नाही."2018 मधे तिने सायकलिंगला सुरूवात केली होती.तेव्हापासून अनेक महिलांनी तिच्याकडून सायकलिंगच्या टीप्स सुद्धा घेतल्या आहेत असेही ती सांगते.एकंदरीत ती अनेक महिलांचे प्रेरणास्थान देखील बनली आहे.