sakal podcast
sakal podcastE sakal

Sakal Podcast : मुस्लिम महिलांना राखी बांधा ते भिडे प्रकरणी फडणवीसांवर विरोधकांचा हल्लाबोल

दिवसभरातल्या ८ महत्त्वाच्या घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.

त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

पंतप्रधान मोदींनी आगामी लोकसभा लक्षात घेता आपल्या खासदारांना एक सल्ला दिलाय, मुस्लिम महिलांसोबत रक्षाबंधन साजरे करण्याचा. काय आहे त्यामागचं कारण जाणून घेऊ बातमीतून. तर मुद्द्यांवर बोला म्हणत रोहित पवार कर्जत जामखेड एमआयडीसीसाठी आक्रमक झालेत. हरियाणातील हिंसाचारावरुन न्यायालयाने सरकारला द्वेषात्मक भाषणावर कारवाई करायला सांगितले आहे.

वेगवान घडामोडींत ऐकू, अमेरिकेच्या राजदूत गीता राव गुप्ता भारत दौऱ्यावर, भिडे प्रकरण पेटलं, प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या आणि इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का! भिडे यांच्या वादग्रस्त विधानावरुन विधानसभेतही चर्चा झाली. यावेळी फडणवीसांना भिडेंची तळी उचलण्याचा प्रयत्न केला पण विरोधकांनी त्यांना कारवाई कधी करणार विचारत भंडावून सोडलंच शिवाय सरकारमध्ये सामील असलेले आमदार अमोल मिटकरींनीही फडणवीसांना घरचा आहेर दिलाय. ऐकूया चर्चेतल्या बातमीत.

१. मुस्लिम महिलांसोबत रक्षाबंधन साजरे करा, PM मोदींचा NDA खासदारांना संदेश

२. कर्जत-जामखेड मतदार संघात MIDCसाठी रोहित पवार आक्रमक

३. देशातील वाढत्या हिंसेवरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले

४. अमेरिकेच्या राजदूत गीता राव गुप्ता भारत दौऱ्यावर

५. भिडे प्रकरण पेटलं, कुठे दुग्धाभिषेक तर कुठे अंत्ययात्रा

६. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

७. इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का!

८. भिडे प्रकरणी फडणवीसांवर विरोधकांचा हल्लाबोल, अमोल मिटकरींचा भाजपला घरचा आहेर

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

..............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com