आमच्याकडे सत्येची, तर चीनकडे बंदुकीची ताकद : दलाई लामा

पीटीआय
बुधवार, 25 डिसेंबर 2019

आमच्याकडे सत्याची तर चीनी साम्यवाद्यांकडे बंदुकीचा ताकद आहे. लांब पल्ल्याच्या शर्यतीत सत्याची ताकद बंदुकीच्या ताकदीपेक्षा जास्त बळकट ठरते, असा संदेश तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी नाताळानिमित्त चीनला बुधवारी दिला.

बोधगया : "आमच्याकडे सत्याची तर चीनी साम्यवाद्यांकडे बंदुकीचा ताकद आहे. लांब पल्ल्याच्या शर्यतीत सत्याची ताकद बंदुकीच्या ताकदीपेक्षा जास्त बळकट ठरते,'' असा संदेश तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी नाताळानिमित्त चीनला बुधवारी दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दीक्षा आणि प्रवचनाच्या कार्यक्रमासाठी दलाई लामा काल मुंबईहून बोधगयेला आले आहे. येथे ते सहा जानेवारीपर्यंत राहणार आहेत. त्यांनी आज महाबोधी मंदिरात पूजा केली. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दलाई लामा म्हणाले की, आमच्याकडे सत्याची तर चीनकडे बंदुकीची ताकद आहे. भारतात सर्वधर्म सदभावनेची परंपरा आहे. येथून अनेक धर्मांचा उदय झाला असला तरी येथे सर्व जण एकजुटीने राहतात. हा आदर्श दुसऱ्या कोणत्याही देशात नाही. 

बौद्ध धर्मीयांची सर्वाधिक संख्या असलेल्या देशांपैकी चीन आहे. आपण ज्या बौद्ध धर्माचे पालन करतो, तो खरा आहे, असे तेथील बौद्ध नारिकांना हळूहळू पटायला लागले आहे, असेही ते म्हणाले. बौद्ध धर्माविषयी ते 6 जानेवारीला प्रवचन देणार आहेत. 

अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण झाले : नरेंद्र मोदी

अहिंसा आणि करुणा जगासाठी आवश्‍यक बाबी ठरल्या आहेत. शांततेच्या मार्गावरुनच विकास आणि प्रगतीचा विचार करता येतो. 
दलाई लामा, तिबेटचे धार्मिक नेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dalai Lama says we have power of truth and China have power of pistol